चैत्र गुडी गुढी पाडवा 2020 महत्व माहिती मुहूर्त पुजा
गुढी पाडवा चैत्र शुद्ध १ हा सण हिंदू लोकांचा महत्वाचा सण आहे. महाराष्ट्रातील लोकांचे नवीन वर्ष ह्या दिवसा पासून चालू होते. साडेतीन मुहूर्त पैकी गुढी पाडवा ह्या सणाचा एक मुहूर्त मानला जातो. ह्या वर्षी गुढी पाडवा बुधवार दिनांक २५ मार्च २०२० ह्या दिवशी आहे.. असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान ब्रह्मा ह्यांनी सृष्टि निर्माण केली आहे तसेच देव, देवी, नर, नारी, दानव, मनुष्य व जीव जंतु निर्माण केले आहेत.
गुढी पाडवा ह्या सणाच्या सर्वांना शूभेच्छा ह्या विडियोमध्ये गुढी पाडवा महत्व, माहिती मुहूर्त व पूजा कशी करायची ते दिले आहे.
गुढी पाडवा महत्व:
गुढी ह्या शब्दाचा अर्थ विजय पताका असा होतो. ह्या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करतात व दुसर्या दिवशी बाकीच्या धर्मातील लोक साजरा करतात. चैत्र महिन्यात झाडाला नवीन पालवी फुटते. गुढी पाडवा ह्या सणाची प्राचीन काळा पासून कहाणी आहे. काही जणाचे असे म्हणणे आहे की ह्या दिवशी श्री राम ह्यांनी रावण वध करून आयोध्याला आले होते व ह्या दिवशी श्री राम व महाभारत मधील युधिष्ठिर ह्याचा राज्याभिषेक झाला होता. व ह्या दिवसा पासून सतयुग ची सुरुवात झाली होती. तर हा दिवशी नवरात्रीच्या नऊ दिवसापैकी पहिल्या दिवसाची सुरुवात होते. व रात्र मोठी होते. ह्या दिवशी श्री भगवान विष्णु ह्यांनी मस्य आवतार घेतला होता. ह्या सर्व कारणांमुळे हा दिवस अगदी शुभ मानला जातो.
गुढी पाडवा हा दिवस पूर्ण दिवस शुभ असल्यामुळे ह्या दिवशी गृह प्रवेश करतात किंवा नवीन काम धंदा सुरू करतात किंवा नवीन वस्तु खरेदी करतात किंवा ह्या दिवशी सोने सुद्धा खरेदी करतात त्यामुळे आपल्या घरात बरकत भरभराट होते.
गुढी पाडवा ह्या दिवशी उपवास करून आपल्याला अखंड सौभाग्य मिळो, घरात सुख शांति नांदो, दुख दारिद्रचा नाश होवो, धन धान्यमध्ये वृद्धी होवो म्हणून प्रार्थना करतात.
गुढी पाडवा मुहूर्त:
प्रथम तिथी सुरवात 14:59:33 पासुन. मार्च 24, 2020 रोजी
प्रथम तिथी समाप्ती 17:28:39 पर्यंत. मार्च 25, 2020 रोजी
गुडी पाडवा पूजा-विधि
सकाळी लवकर उठून घर झाडून पुसून घ्या. मग आंघोळ करून घरा समोर सडा घालून रांगोळी काढावी.
शास्त्रा नुसार म्हणतात की सकाळी सूर्योदय होण्या पूर्वी आंघोळ करून गुडी उभारून पूजा करावी.
पूर्वीच्या काळी महिला पाडव्याच्या दिवशी नऊवार साडी नेसून दाग दागिने घालत. व पुरुष केशरी रंगाचा कुर्ता व पांढरा पायजमा घालत.
पाडव्याच्या दिवशी सगळे नातेवाईक एकत्र येत व नवीन वर्षाच्या शूबेच्छा देत. ह्या दिवशी कडीलिंब च्या पानांना फार महत्व आहे. कडीलिंबाच पान खातात त्यामुळे आपल्या शरीरातील कृमी निघून जातात व आपले शरीरातील रक्त शुद्ध होते व रोग प्र्तिकार शक्ति वाढते. किंवा कडीलिंबू पाने गूळ व चिंच ह्याची चटणी बनवतात. ही चटणी छान आंबट गोड लागते.
महाराष्टात गुडी पाडवा ह्या दिवशी देवाला नेवेद्य दाखवताना श्रीखंड-पुरी, पुराण पोळी किंवा खीर बनवतात.
गुडी कशी उभारायची:
आपण ज्या जागी गुडी उभारणार आहोत तीजागा स्वच्छ साफ करून घ्या. त्या जागेवर स्वस्तिक काढावे व त्यावर हळद-कुकु लावावे म्हणजे ती जागा पवित्र होईल.
मग एक स्वच्छ लाकडाची काठी घेवून त्यावर जरीची साडी केशरी रंगाची किंवा रेशमी साडी घेवून त्याच्या नीर्या घालून काठीवर लावावी त्यावर कडीलिंबाची व आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गुडी लावून त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा कलश लावावा (कलश वर पाच कुंकुच्या उभ्या रेषा काढाव्या मध्ये कुकुचे स्वस्तिक काढावे. गुडी उंच उभारावी जेणे करून सर्वांना दिसेल.
गुडी उभारून झाल्यावर एका थाळीमध्ये हळद-कुंकु, तांदूळ, फुले, दिवा व गोड पदार्थ ठेवून यथासांग पुजा करावी. आपल्या घरच्या व आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करावी. संध्याकाळी सूर्यास्त होण्याआधी गुडी खाली उतरावावी.
The Marathi language video of this Gudi Padwa 2020 information can be seen here – Gudi Padwa 2020 Chi Mahiti Va Muhurat