हनुमान जयंती स्पेशल हनुमानजीना भोग प्रसाद रोट लाडू चुरमा लाडू Roat Ladoo
हनुमान जयंती ह्या दिवशी हनुमानजी ना चुरमा लाडू किंवा रोट लाडू बनवून नेवेद्य भोग प्रसाद दाखवून त्यांना प्रसन्न करून घ्या मग आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतील. कारण गव्हाचे पीठ व गूळ वापरुन केलेला भोग हनुमानजींना खूप आवडतो.
आता हनुमान जयंती 8 एप्रिल 2020 ह्या दिवशी आहे. उत्तर भारतात अश्या प्रकारचा भोज सणावारला करतात आपण अश्या प्रकारचे लाडू सणवाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो.
गहू व गूळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा अश्या प्रकारचे पौस्टीक लाडू खूप आवडतील. बनवायला सोपे व झटपट होणारे आहे.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 10-12 लाडू बनतता
साहीत्य:
पीठ मळण्यासाठी:
2 कप गव्हाचे पीठ
मीठ चवीने
1 टे स्पून तेल
लाडू करीता:
3/4 कप गूळ (चिरून)
1 टी स्पून वेलची पावडर
4 टे स्पून साजूक तूप
थोडे ड्रायफ्रूट (चीरून)
कृती:
प्रथम गव्हाचे पीठ व मीठ घालून घट्ट पीठ मळून घेवून बाजूला 30 मिनिट ठेवा. गूळ चिरून घ्या.
मळलेल्या पिठाचे दोन भाग करून घ्या. एक भाग करून तो थोडासा जाडसर लाटून घ्या. नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झालकी लातलेली पोळी त्यावर घाला, थोडी भाजून झालीकी त्यावर 1/2 टी स्पून तूप घाला मग उलट करून थोडी भाजून घ्या. वॉरतून तूप घाला व दुसर्या बाजूनी सुद्धा तुपावर छान खरपूस भाजून घ्या. एका पोळीला 1 टे स्पून तूप वापरा.
दुसरी चपातीसुद्धा अश्याप्रकारे लाटून भाजून घ्या. दोन्ही चपातीचे तुकडे करून घेवून मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्या. वाटलेली चपाती एका बाउलमध्ये काढून घ्या, त्यामध्ये चीरलेला गूळ, वेलची पावडर, ड्रायफ्रूट घाला.
मिक्सरच्या भांड्यात निम्मे मिक्स केलेले मिश्रण घेवून 1 टे स्पून तूप घाला जर तुम्हाला एक टे स्पून तूप न घालता कमी घालायचे असेल तर कमी घाला. मग थोडे परत ग्राइंड करून घ्या. दुसरे राहीलेले मिश्रण सुद्धा ग्राइंड करून घ्या. एका बाउलमध्ये सर्व मिश्रण घेवून हलक्या हातानी मिक्स करून घेवून त्याचे छोटे छोटे लाडू वळून घ्या.
रोट लाडू किंवा चुरमा लाडू चा भोग प्रसाद हनुमानजींना दाखवा व तुम्ही सुद्धा घ्या.
The Marathi language video of this Hanuman Jayanti Bhog for Lord Hanuman can be seen here – Roat Laddu Prasad for the Festival of Hanuman Jayanti