लॉक डाउनमध्ये रव्या पासून पौस्टीक झटपट नाश्ता कसा बनवायचा रेसिपी
लॉक डाउनमध्ये रव्या पासून पौस्टीक झटपट नाश्ता | Zatpat Suji Breakfast
आता सध्या जगभर लॉक डाउन चालू आहे. घरातील सगळ्यांना सुट्या आहेत शाळा ऑफिस बंद आहेत. आपल्याला घरामध्ये जे काय सामान आहे त्यामध्ये छान छान पदार्थ बनवता येतात. भाज्यामध्ये आपल्या घरी बटाटे तर असतात व रवा सुधा असतो. हे दोन साहीत्य वापरुन आपण एक छान झटपट व निराळा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत.
मुलांना व घरातील बाकीच्या मेंबर्स ना सुटी असल्यामुळे रोज काही तरी वेगळे करण्याची फर्माईश असते. चला तर मग आपण एक झटपट व अगदी निराळा नाष्टा कसा बनवायचा ते बघू या.
साहीत्य:
2 मध्यम आकाराचे बटाटे
2 टे स्पून दही
1 मोठी हिरवी मिरची
1 कप बारीक रवा
1/4 कप पाणी
1 टी स्पून तेल
1 टी स्पून मीठ
1 टी स्पून साखर
1 टी स्पून लिंबूरस
1/2 टी स्पून बेकिंग सोडा
फोडणी करीता:
2 टे स्पून तेल
2 टी स्पून मोहरी
8-10 कडीपत्ता पाने
2 टे स्पून तेल फ्राय करण्यासाठी
कृती:
बटाटा धुवून सोलून चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यात चिरलेले बटाटे, हिरवी मिरची व दही बारीक वाटून घ्या.
एका बाउलमध्ये बारीक रवा, पाणी, मीठ, तेल व वाटलेला बटाटा घालून मिक्स करून घेवून 10 मिनिट झाकून ठेवा. एका स्टीलच्या ट्रेला तेल लावून घ्या. मोठ्या भांड्यात 2 कप पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये एक स्टँड ठेवा.
मग त्यामध्ये साखर, लिंबूरस, बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करून घ्या. मग मिश्रण तेल लावलेल्या ट्रेमध्ये ओतून घ्या. व ट्रे गरम पाणी केलेल्या भांड्यात ठेवा वरती झाकण ठेवून 20 मिनिट वाफवून घ्या. 20 मिनिट झाल्यावर ट्रे बाहेर काढून थंड करायला ठेवा थंड झाल्यावर त्याच्या उभ्या स्ट्रिप्स कापून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा तेल गरम झालेकी त्यामध्ये मोहरी व कडीपत्ता घालून कापलेल्या स्ट्रिप्स पॅनमध्ये लावून घेवून एमजी बाजूनी थोडे तेल सोडा छान खरपूस भाजून घ्या. मग उलट करून परत बाजूनी थोडे तेल सोडून छान खरपूस भाजून घ्या. गरम गरम नाश्ता टोमॅटो सॉस बरोबर किवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Aloo Suji or Potato Rawa Sticks recipe can be seen here – Healthy and Delicious Suji Potato Sticks