हळद औषधी गुणधर्म (सर्दी खोकला रक्तशुद्ध त्वचा रिंगवर्म)
हळद ही आपणा सर्वांना परिचयाची आहे. आपल्या रोजच्या जेवणात तसेच घरगुती उपचार करण्यासाठी आपल्या प्राचीन काळा पासून उपयोग केला जातो. हळद आपण भाजी आमटी साठी वापरतो त्याच्या मुळे रंगपण छान येतो.
आपल्याला माहीत आहे का की हळदीमध्ये दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारामध्ये लोखंडी हळद ह्याच्या पासून रंग बनवतात. दूसरा प्रकार म्हणजे सुगंधी हळद ह्याचा उपयोग मसाला म्हणून वापरतात. तसेच अजून एक प्रकारची हळद म्हणजे आंबे हळद ही मसालासाठी वापरली जात नाही. आंबे हळद ही रक्तदोष साठी वापरली जाते.
हळद ही एक उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे. हळद ही लहान मुले, मोठी माणसे, स्त्रीय, गरोदर महिला, ह्या सर्वांसाठी उपयुक्त आहे. हळदीच्या सेवनाने नुकसान न होता आपल्या शरीराला फायदाच होतो.
हळदीमध्ये रक्तशुद्ध करण्याच्या मोठा गुणधर्म आहे. हळदी मुळे रक्तशुद्ध हौऊन आपल्या शरीराची त्वचा म्हणजे स्कीनपण चांगली होते.
लग्नाच्या वेळेस नववधूला हळद लावायची पद्धत आहे. हळदीमध्ये कफ व व आम नष्ट करण्याच्या गुण आहे. खोकला झाला तर दुधामध्ये हळद घालून दूध गरम करून त्याचे सेवन करतात. हळदीमुळे शरीराचा वर्ण उजलतो. हळद कफ, पित्त, त्वचारोग, रक्तविकार, सूज, कोड, खरूज, अपचन, दूर करते.
गरम दुधात हळद व मिरे पावडर घालून त्याचे सेवन केल्याने थंडी वाजून येणारा ताप नाहीसा होतो. घसा बसला असेल तर रात्री झोपताना गरम दुधात हळद घालून प्या. मुलांना गरम दुधात हळद व गूळ घालून प्यायला द्या त्यामुळे सर्दी, खोकला, कफ दूर होतो.
मुकामार लागला असेलतर हळद व चुना मिक्स करून त्याचा लेप लावावा. जखम झालेल्या ठिकाणी हळदीची पूड दाबून लावावी त्यामुळे जखमेतून येणारे रक्त थांबते. जर एखादी जखम भरून येत नसेल तर जखमेवर हळद लावून गरम तेल लावल्यास जखम लवकर भरून येते.
जर आपल्या शरीरावर म्हणजेच स्कीनवर फंगल इन्फेकशन झाले आहे किंवा रिंग वर्म झाले असतील तर अगदी सोपा घरगुती उपाय आहे.
आपण डॉक्टरकडे जावून महागडी औषधे घेण्या पेक्षा हा सोपा कमी खर्चाचा उपाय करून बघा. एका छोट्या वाटीत 1/2 टी स्पून हळद घेवून त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करून रोज रात्री झोपताना रिंग वर्म झालेल्या भागावर लावावे 4-5 दिवसात फरक जाणवेल व रिंग वर्म निघून जाईल. पण 15 दिवस हा उपाय करावा
अशी आहे ही गुणकारी हळद.
The Marathi language video of this article on Home Remedies using Turmeric can be seen here – Haldiche Gharguti Upay