हेल्दि पौस्टीक टरबूजच्या साल वापरुन डोसा रेसीपी
टरबूजच्या सालामध्ये एंटीऑक्सीडेंट, खनिज, विटामिन भरपूर प्रमाणात असतात. कैलरी कमी प्रमाणात असतात पण विटामीन “A” विटामीन “C”, विटामीन “B 6, पोट्याशीयम, जिंक असते.
आपण ह्या आगोदरच्या विडियोमध्ये टरबूजच्या सालाच्या सेवनाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय काय फायदे होतात ते आपण पाहिले.
टरबूजची साल टाकून न देता आपण त्यापासून भाजी, पराठा, डोसा बनवू शकतो. टरबूजची साल वापरुन डोसे कसे बनवायचे ते आपण ह्या विडियोमध्ये बघणार आहोत. अश्या प्रकारचे डोसे पौस्टीक तर आहेतच तसेच आपण नाश्त्याला किंवा जेवणात बनवू शकतो. लहान मुलांना अश्या प्रकारचे डोसे खूप आवडतील
टरबूच्या सलाचे औषधी गुणधर्म आपण आमच्या साईटवर येथे पाहू शकता: https://www.youtube.com/watch?v=xsk6Omoci5M
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 8 डोसे बनतात
साहीत्य:
1 कप टरबूजची साल (पांढरा भाग)
1/4 कप टरबूज लाल भाग
1/2 कप तांदळाचे पीठ
1/2 कप बारीक रवा
1/4 कप बेसन
1/2 कप टरबूजचा लाल भाग
मीठ चवीने
तेल डोसा भाजण्यासाठी
कृती: टरबूजची साल स्वच्छ धुवून घ्या. मग त्याचा हिरवा बाहेरील भाग काढून टाका व पांढरा भाग चिरून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात टरबूजची चिरलेली साल, तांदळाचे पीठ, रवा, बेसन, टरबूजचा लाल भाग व मीठ घालून थोडे पाणी घालून ग्राईंड करून घ्या. ग्राइंड केलेले मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. लागेल तसे पाणी घालून मिश्रण डोश्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून थोडेसे तेल लावून घ्या. मग त्यावर एक डाव मिश्रण घालून हळुवार पणे पसरवून बाजूनी थोडे तेल सोडून दोन्ही बाजूंनी डोसा भाजून घ्या.
गरम गरम डोसा सर्व्ह करा.
The Marathi language video of this Kalingad / Tarbuj Dosa can be seen here – Watermelon Rinds Dosa