सौंदर्यासाठी बेकिंग सोडा चे अमेझिंग टिप्स फायदे भाग-1
बेकिंग सोडा आपणा सर्वांना माहीत आहेच. तो खूप गुणकारी आहे. बेकिंग सोडाचा उपयोग आपले शरीरातील दोष व त्वचा रोग यासाठी उपयोगी आहेत. त्यालाचा इंग्लिशमध्ये सोडियम बाइकार्बोनेट (NaHCO3) असे म्हणतात. आपल्या त्वचा संबंधी तक्रारी साठी बेकिंग सोडा हा एक रामबाण उपाय आहे. बेकिंग सोड्यामुळे आपले बरेच रोग बरे होवून आपण त्यापासून मुक्त सुद्धा होतो. ह्या विडियोमध्ये आपण बघूया की बेकिंग सोडा किती गुणकारी आहे.
बेकिंग सोडा मुळे होणारे फायदे त्वचा, चेहर्यावरील मुरूम, पुटकुळया पींपल्स, तेलकट त्वचा, सनबर्न किंवा उन्हात त्वचा काळी होणे, डार्क स्पोर्ट काळे डाग.
बेकिंग सोडा चे फायदे
1) आपली त्वचा चमकदार कशी बनते:
2 टे स्पून संत्र्याचा ज्यूस व 1 टे स्पून बेकिंग सोडा घेवून त्याचे पेस्ट करून घ्या. आपला चेहरा स्वच्छ धुवून पुसून घेऊन त्यावर बनवलेली पेस्ट लावा. 15 मिनिटांनी चेहर्यावर थोडेसे पाणी शिंपडून थोडे हळू हळू हातानी चोळून घ्या. मग चेहरा थंड पाण्यानी धुवून पुसून घेवून मॉइस्चराइजर लावा. हे फक्त आठोड्यातून एकदाच करा.
असे केल्याने संत्र्यामध्ये विटामिन “C” भरपूर असते ते आपल्या त्वचेचे कोलेजन वाढवण्यास मदत करते. कोलेजन हे म्हणजे आपल्या शरीरातील एक प्रोटीन आहे त्यामुळे हाडे, कार्टीलेज, मासपेशी, त्वचा निरोगी ठेवते व बेकिंग सोडामध्ये क्लींजिंग म्हणजे त्वचा साफ करण्याचे गुण आहेत. त्यामुळे चेहर्या वरील दाग-धब्बे, मुरूम, पुटकुळया नाहीसे करण्याचे काम करते. तसेच आपल्या चेहर्याच्या त्वचेची छिद्रे मोकळी करते.
2) चेहर्यावरील मुरूम, पुटकुळया पींपल्स:
चेहर्यावरील मुरूम, पुटकुळया पींपल्स काढण्यासाठी 1 टी स्पून बेकिंग सोडा व 1 टी स्पून पाणी मिस्क करून त्याची पेस्ट बनवून घ्या. आपला चेहरा स्वच्छ धुवून पुसून घ्या व जेथे मुरूम, पुटकुळया पींपल्स आले आहेत त्या भागावर बनवलेली पेस्ट लावून बोटांनी हळुवारपणे 2-3 मिनिट मसाज करा. मग कोमट पाण्यांनी चेहरा धुवून मॉइस्चराइजर लावा. असे आठोड्यातून दोन वेळा करा.
असे केल्याने पिंपल्स, ब्लैकहेड्स, मुरूम ह्या वर बेकिंग सोडा अगदी चांगल्या प्रकारे काम करते. बेकिंग सोडामध्ये एंटीबैक्टीरियल गुण आहेत त्यामुळे नवीन तयार होणारे पिंपल्स, ब्लैकहेड्स, मुरूम ह्यांच्या विषाणूंना मारण्याचे काम करते.
3) तेलकट त्वचा:
आपली तेलकट त्वचा असेल तर 1 टे स्पून बेकिंग सोडा व 1 1/2 टे स्पून पाणी घेवून त्याची पेस्ट बनवा.आपला चेहरा पाण्यानी धुवून पुसून घ्या. मग डोळ्याच्या बाजूचा भाग सोडून बाकीच्या भागावर बनवलेली पेस्ट पूर्ण चेहर्यावर लावून बोटांनी हळुवारपणे 15 सेकंद मसाज करा. मग थंड पाण्यानी आपला चेहरा धुवून पुसून घ्या. असे आठोड्यात दोन वेळा करा.
बेकिंग सोडा तेलकट त्वचेसाठी गुणकारी आहे. बेकिंग सोडा आपल्या त्वचेच्या मृत पेशीला मॉइस्चराइज करण्याचे काम करते.
4) सनबर्न किंवा उन्हात त्वचा काळी होणे:
आपण ऑफिसच्या कामासाठी किंवा काही इतर कामा साठी उन्हात फिरतो त्यामुळे आपली त्वचा काळवंडते त्यासाठी आपल्या अंघोळीच्या टबमध्ये कोमट पाण्यात 1 कप बेकिंग सोडा व 2-4 कप ओट्स पाउडर मिक्स करून त्यापाण्यानी 20 मिनिट आंघोळ करायची. आपली स्कीन सनबर्न झाली की असे थोडे दिवस रोज करावे.
बेकिंग सोडाचा उपयोग स्कीन सनबर्न झाली की उपयोगी आहे. कारण बेकिंग सोडामध्ये एंटीइंफ्लेमेटरी गुण आहेत ते आपल्या सनबर्न झालेल्या स्कीनसाठी प्रभावी आहेत व आपली त्वचा चांगली बनवते.
5. डार्क स्पोर्ट काळे डाग:
डार्क स्पोर्ट काळे डाग ह्यासाठी 1 टे स्पून बेकिंग सोडा 1 टी स्पून लिंबूरस ह्याची पेस्ट बनवावी व जेथे डार्क स्पोर्ट काळे डाग आहेत तेथे बनवलेले मिश्रण लावून 3-4 मिनिट तसेच ठेवावे. मग कोमट पाण्यानी चेहरा धुवून मॉइस्चराइजर लावावे. असे आठोड्यातून 2-3 वेळा करावे.
चहर्यावरील डार्क स्पोर्ट काळे डाग साठी बेकिंग सोडा उपयुक्त आहे. बेकिंग सोडामध्ये एक्सफोलिएटर आहे त्यामुळे आपल्या चहर्यावरील मृत पेशी काढण्याचे काम करते. तसेच लिंबू आपली त्वचा चमकदार बनवते.
The Marathi Language video of these Beauty Tips and Tricks can be seen here – Simple and Practical Beauty Tips Using Baking Soda