शिमला मिर्चची अशी टेस्टी भाजी बनवली तर नुसती खातच राहाल
शिमला मिर्चची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते. ह्या आगोदर आपण शिमला मिर्चची बेसन पेरून भाजी, स्टाफ करून भाजी किंवा पंजाबी भाजी बघितली.
आता आपण ह्या विडियो मध्ये शिमला मिर्चची अगदी वेगळ्या प्रकारची भाजी बघणार आहोत. अश्या प्रकारची शिमला मिर्च आपण बनवली तर नुसते खातच राहाल इतकी छान टेस्टी लागते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
3 मध्यम आकाराच्या शिमला मिर्च
2 मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
2 टे स्पून बेसन
1 टे स्पून आले-लसूण पेस्ट
1 मोठा टोमॅटो (चिरून)
1 टे स्पून दही
1/2 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून गरम मसाला
1/2 टी स्पून धने-जिरे पावडर
1/4 टी स्पून हळद
मीठ चवीने
2 टे स्पून तेल
कोथबीर सजावटी करिता
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
1/2 टी स्पून मेथी दाणे
1/2 टी स्पून मोहरी डाळ
1/4 टी स्पून हिंग
कृती: कढई गरम करून एक टी स्पून तेल गरम करून बेसन गुलाबी रंगावर भाजून घेवून बाजूला ठेवा. मग शिमला मिर्च धुवून थोडे मोठे चौकोनी तुकडे करून घ्या. कांदा व टोमॅटो बारिक चिरून घ्या. आले-लसूण बारीक करून घ्या. कोथबिर धुवून चिरून घ्या.
कढईमद्धे दोन टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये शिमला मिर्चचे तुकडे परतून घ्या व बाजूला ठेवा. परत कढईमद्धे दोन टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मेथी दाणे, मोहरी डाळ, हिंग घालून चीरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या, मग त्यामध्ये आले-लसूण पेस्ट घालून थोडीशी परतून घेवून दही घाला व एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये टोमॅटो घालून एक मिनिट परतून घ्या. टोमॅटो परतून झाल्यावर काश्मिरी लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर , हळद, गरम मसाला, मीठ घालून मिक्स करून 1/2 कप पाणी घालून मसाला शीजवून घ्या. मसाला शिजला की त्यामध्ये परत 1/4 कप पाणी घालून थोडे गरम झालेकी परतलेली शिमला मिर्च घालून एक चांगली वाफ येऊ द्या.
गरम गरम शिमला मिर्च भाजी चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Capsicum Veg Preparation can be seen here – Spicy and Mouthwatering Shimla Mirch Bhaji