2 प्रकारचे महाराष्ट्रीयन पारंपारिक कांदा व काकडी खमंग भाजणीचे थालीपीठ
पारंपारिक थालीपीठ भाजणी पीठ कसे बनवायचे ह्याचा विडियो येथे पहा: How to Make Bhajani Peeth
थालीपीठ म्हंटले की महाराष्ट्रियन लोकांची अगदी आवडतीची, लोकप्रिय व पौस्टीक डिश आहे. थालीपीठ आपण नाश्त्याला किंवा जवणात सुद्धा बनवू शकतो. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. मुले अगदी आवडीने खातात.
खमंग पौस्टीक थालीपीठ भाजणी पीठ कसे बनवायचे ते ह्या आगोदर विडियो मध्ये प्र्काशीत केले आहे. व तो विडियो खूप लोकप्रिय सुद्धा झाला आहे. थालीपीठ भाजणी पीठ बनवताना त्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी व धने वापरले आहेत.
खमंग थालीपीठ ह्या विडियोमध्ये दोन प्रकारचे दाखवले आहे. पहिले थालीपीठ म्हणजे कांदा वापरुन ते खूप टेस्टी लागते कांदा कोथबिरचे थालीपीठ अगदी पारंपारिक आहे व दुसरे काकडी वापरुन ते तर अप्रतीम लागते. मुले काकडी खायचा कंटाळा करतात तर थालीपीठ बनवताना काकडी घालून बनवा खूप छान लागते. काकडी वापरुन बनवलेले थालीपीठ हे नवीन पद्धतीने आहे.
जर तुमच्याकडे थालीपीठ भाजणी नसेलतर गव्हाचे पीठ, बेसन, तांदळाचे पीठ व ज्वारीचे पीठ वापरावे.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 9 थालीपीठ बनतात
1) कांद्याचे थालीपीठ
3 कप थालीपीठ भाजणी
1 मध्यम आकाराचा कांदा (उभा पातळ चिरून)
1 टे स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
(8-10 लसूण,1” आले तुकडा, 2-3 हिरव्या मिरच्या)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हळद
1/4 टी स्पून हिंग
1/4 कप कोथबिर (चिरून)
मीठ चवीने
तेल थालीपीठ भाजण्यासाठी
2) काकडीचे थालीपीठ
साहीत्य सर्व वरील प्रमाणेच
फक्त अजून खाली दिलेले अजून घ्या
1 कप काकडी (किसून)
8-10 कडीपत्ता पाने (चिरून)
1 टी स्पून ओवा
1 टी स्पून तीळ
कृती:
कांदा उभा पातळ चिरून घ्या. कोथबिर चिरून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची वाटून घ्या. काकडी धुवून सोलून किसून घ्या. एका मोठ्या बाउलमध्ये थालीपीठ भाजणी घेवून त्यामध्ये चिरलेला कांदा, कोथबिर, आले-लसूण-हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ घालून मिक्स करून घ्या.
मिश्रण मिक्स केल्यावर त्याचे दोन भाग करा. एक भाग घेवून त्यामध्ये थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ फार घट्ट किंवा पातळ मळायचे नाही. पीठ मळून झाल्यावर झाकून 15 मिनिट बाजूला ठेवा.
दुसर्या भागामध्ये ओवा, तीळ, कडीपत्ता व किसलेली काकडी घालून मिक्स करून घ्या. मग 1/4 कप पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर झाकून 15 मिनिट बाजूला ठेवा.
नॉनस्टिक तवा तेल लावून गरम करायला ठेवा. थालीपीठ बनवण्यासाठी मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घ्या. पोळपाटावर एक स्वच्छ कपडा ओला करून ठेवा. त्यावर थोडेसे पाणी शिंपडून गोळा हाताच्या बोटांनी हळुवार थापून घ्या. मध्ये 5-6 ठिकाणी बोटानी होल करा. मग कापडा सकट थालीपीठ उलट करून तव्यावर टाका कापडची बाजू वर आली पाहिजे. थालीपीठ घातल्यावर कापड काढून घेवून बाजूनी थोडे तेल सोडून दोनी बाजूंनी थालीपीठ भाजून घ्या. अश्या प्रकारचे कांद्याचे व काकडीचे थालीपीठ बनवून घ्या.
गरम गरम थालीपीठ टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language Video of this recipe can be seen Here: Maharashtrian Style Traditional Onion And Cucumber Bhajini Thalipeeth