महाराष्ट्रियन स्टाईल अगदी निराळे चटपटे दुधी भोपळा मुठिया एक चीज टाका व बघा तुम्ही खातच राहाल
महाराष्ट्रियन स्टाईल टेस्टी दुधी भोपळा मुठिया
Maharashtrian Style Tasty Spicy Dudhi Bhopla Muthiya Bottle Gourd Muthia Recipe
दुधी भोपळा मुठिया ही खर म्हणजे गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. पण ती जर अगदी वेगळ्या पद्धतीने बनवून त्याला महाराष्ट्रियन चटपटीत टेस्ट बनवले तर त्याची टेस्ट अगदी न्यारीच लागेल. तुम्ही सुधा बनवून बघा तुमच्या घरी सुद्धा नक्की आवडेल.
दुधी भोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. दुधी हा फार गुणकारी आहे. आपण ह्या अगोदर दुधी भोपळा हलवा, भाजी, पराठे बघीतले.
दुधी भोपळ्या पासून मुठिया बनवतांना गव्हाचे पीठ, बेसन वापरतात पण ह्या विडियो मध्ये गव्हाचे पीठ व बेसन न वापरता थालीपीठ भजनी वापरली आहे. त्यामुळे पौस्टीक दुधी भोपळा मुठिया म्हणायला हरकत नाही.
साहीत्य:
1 कप दुधी भोपळा (कीस)
3/4 कप थालीपीठ भाजणी
1 टे स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1 टी स्पून ओवा
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून हळद
1/4 टी स्पून हिंग
1 टी स्पून लिंबू रस
मीठ व साखर चवीने
1 टी स्पून तेल
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
फोडणी करीता:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
7-8 कडीपत्ता पाने
1 टे स्पून तीळ
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
कृती:
प्रथम दुधी भोपळा धुवून, सोलून किसून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट बनवून घ्या. कोथबिर चिरून घ्या.
एका बाउलमध्ये किसलेला दुधी भोपळा, भाजणी पीठ, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, ओवा, लिंबूरस, कोथबिर, साखर व मीठ घालून चांगले मळून घ्या. मळेलेले पीठ 10-15 मिनिट झाकून बाजूला ठेवा. मग त्याचे लांबट गोळे बनवून घ्या.
एका स्टीलच्या भांड्यात 4-5 ग्लास पाणी गरम करायला ठेवा. पाणी चांगले गरम झाले की त्यावर चाळणी ठेवून त्यामध्ये दुधीचे बनवलेले लांबट गोळे ठेवा. चाळणीवर झाकण ठेवून 12-15 मिनिट मिडियम विस्तवावर उकडून घ्या. 12-15 मिनिट झाल्यावर झाकण काढून गोळे थंड करायला ठेवा. गोळे थंड झाल्यावर त्याचे गोल गोल 1/2” चे तुकडे करून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, तीळ घालून खमंग फोडणी झाली की त्यामध्ये दुधी भोपळाचे गोल गोल चिरलेले काप घालून मिक्स करा. 5-7 मिनिट मंद विस्तवावर चांगले फ्राय करून घ्या. मग त्यावरचिरलेली कोथबिर घालून मिक्स करा.
गरम गरम महाराष्ट्रियन स्टाईल दुधी मुठीया कोथबिर घालून सर्व्ह करा.
The video of how to make Khamang Thalipeeth Bhajani Peeth can be seen here:Khamang Thalipeeth Bhajni Peeth
The text recipe of this Video can be seen here : Maharashtrian Style Tasty Spicy Dudhi Bhopla Muthiya Bottle Gourd Muthia