होममेड नॅचरल सिम्पल मॅंगो जाम व स्पाइसी मॅंगो जाम बिना साखर, रंग किंवा प्रिजर्वेटिव रेसिपी
दोन प्रकारे सिम्पल मॅंगो जाम व स्पाइसी मॅंगो जाम बिना साखर रेसिपी इन मराठी
Home made Natural Simple Mango Jam And Spicy Mango Jam without Sugar Preservative And Colour In Marathi
मॅंगो जाम म्हणजे मुलांचा अगदी आवडतीचा आहे. मॅंगो जाम आपण ब्रेडला लावून किंवा चपाती किंवा पराठाला लावून सर्व्ह करू शकतो.
सकाळी ब्रेडफास्टला किंवा मुलांना डब्यात द्यायला किंवा दुपारी दुधा बरोबर सर्व्ह करायला मस्त आहे, मुले अगदी मिनिटात संपवतील.
मॅंगो जाम बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. टेस्टी तर लागतोच तर त्याचा रंग व सुगंधपण आपल्याला मोहित करतो.
होममेड सिम्पल मॅंगो जाम व स्पाइसी मॅंगो जाम बिना साखर, रंग किंवा प्रिजर्वेटिव असे दोन प्रकारचे मॅंगो जाम आपण बघणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य: सिम्पल मॅंगो जाम
2 कप मॅंगो पिसेस
3/4 कप साखर (थोडी कमी घातलीतरी चालेल)
1 टी स्पून वेलची पावडर
1/2 कप पाणी
साहीत्य: स्पायसी मॅंगो जाम
2 कप मॅंगो पिसेस
2 टे स्पून मध
2-3 छोटे आल तुकडे (1/2” चे)
1” दालचीनी तुकडा
1 टी स्पून चिली फ्लेक्स
कृती:
सिम्पल मॅंगो जाम: आंबे स्वच्छ धुवून पुसून त्याची साल काढून त्याच्या फोडी करून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईमद्धे आंब्याच्या फोडी घेवून मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. साधारणपणे 4-5 मिनिट मध्ये फोडी मऊ होतील मग त्यामध्ये साखर घालून साखर व पाणी घालून मिक्स करून परत मंद विस्तवावर आटत ठेवा. मिश्रण आटत आलेकी त्यामध्ये वेलची पूड घालून मिक्स करा.
आंब्याचे मिश्रण थोडेसे एका प्लेटमध्ये काढून चेक करा. प्लेटमध्ये एकडे तिकडे ओघळले नाही पाहिजे. मग विस्तव बंद करून आंब्याचा जाम थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर बरणीमद्धे भरून ठेवा.
स्पायसी मॅंगो जाम: आंबे स्वच्छ धुवून पुसून त्याची साल काढून त्याच्या फोडी करून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईमद्धे आंब्याच्या फोडी घेवून मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. साधारणपणे 4-5 मिनिट मध्ये फोडी मऊ होतील मग त्यामध्ये मध, आले तुकडा व दालचीनी तुकडा घालून मंद विस्तवावर आटत ठेवा. मिश्रण आटत आलेकी त्यामध्ये 3/4 टी स्पून चिली फ्लेक्स घालून मिक्स करा.
आंब्याचे मिश्रण थोडेसे एका प्लेटमध्ये काढून चेक करा. प्लेटमध्ये एकडे तिकडे ओघळले नाही पाहिजे. मग विस्तव बंद करून आंब्याचा जाम थंड करायला ठेवा परत वरतून सजावटीसाठी चिली फ्लेक्स घाला.
सिम्पल मॅंगो जाम व स्पायसी मॅंगो जाम आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. नाश्त्याला किंवा डब्यात मुलांना ब्रेडला किंवा चपातीला किंवा पराठाला देता येतो.
The Recipe of this Video can be seen here: Simple Mango Jam And Spicy Mango Jam without Sugar Preservative And Colour