झणझणीत कांदा शेंगदाणा चटणी रेसिपी
Maharashtrian Spicy Tasty Kanda Shengdana Chutney Recipe In Marathi
चटणी हा पदार्थ असा आहे की त्यामुळे आपल्या तोंडाला छान चव येते. आपण ह्या अगोदर बर्याच प्रकारच्या चटण्या पाहिल्या. आता आपण झटपट चटणीचा एक निराळा प्रकार बघणार आहोत.
बर्याच वेळा असे होते की घरात काही कारणामुळे भाजी नसते तर मग आपण अश्या प्रकारची झणझणीत कांदा शेंगदाणा चटणी बनवू शकतो. अश्या प्रकारची चटणी खेडेगावात खूप लोकप्रिय आहे.
झणझणीत कांदा शेंगदाणा चटणी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. आपण अश्या प्रकारची चटणी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणासाठी
साहीत्य:
1मोठ्या आकाराचा कांदा
2 टे स्पून शेगदाणा कूट
7-8 लसूण पाकळ्या
1” आले तुकडा
3-4 हिरव्या मिरच्या
1 /4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1/2 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
कोथबिर चिरून
फोडणी करीता:
2 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
कृती: प्रथम शेगदाणे भाजून सोलून कूट करून घ्या. आले-लसूण हिरवी मिरची कुटून घ्या. कांदा चिरून घ्या. कोथबिर चिरून घ्या.
एका मध्यम आकाराच्या कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून चिरलेला कांदा घाला. कांदा चांगला परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये आल=लसूण हिरवी मिरची घालून परतून घ्या.
कांदा आल-लसूण हिरवी मिरची चांगली परतून झाल्यावर लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला घालून मिक्स करून शेगदाणा कूट घालून मिक्स करून थोडे परतून घ्या. शेगदाणा कुटाला थोडे तेल सुटायला लागले की कोथबिर घालून मिक्स करून विस्तव बंद करा.
गरम गरम झणझणीत कांदा शेंगदाणा चटणी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.
The Video of this Recipe can be seen here: Maharashtrian Spicy Tasty Kanda Shengdana Chutney