2 प्रकारच्या सोप्या महाराष्ट्रियन स्टाईल पारंपारिक हिरव्या मिरचीचा खर्डा व लसणाची चटणी रेसीपी
Maharashtrian Style Traditional Hirvya Mirchicha Thecha And Lasanachi Chutney
महाराष्ट्रियन स्टाईल पारंपारिक हिरव्या मिरचीचा खर्डा: हिरव्या मिरचीचा खरडा ही एक अप्रतीम चटणी आहे. हा खरडा महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. खास म्हणजे खेडेगावात पिठलं भाकरी व हिरव्या मिरचीचा खर्डा बनवतात. ह्या मुळे तोंडाला छान चव येते. अगदी लवकर बनवता येणारा आहे.
आरोग्यदाई लसणाची चटणी: लसूण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. कोकणह्या भागात आजारी माणसाला भाताच्या पेज बरोबर लसणाची चटणी देण्याची पद्धत आहे. आजारपणात आपल्या तोंडाला चव नसते. लसणाच्या चटणीमुळे तोंडाला चव येते व भूकसुद्धा लागते.
लसणाची चटणी व हिरव्या मिरचीचा खरडा बनवायला अगदी सोपा आहे. व झटपट होणारा आहे. त्यामुळे जेवणात छान चवपण येते.
हिरव्या मिरचीचा खर्डा साहित्य:
१५ हिरव्या ताज्या मिरच्या
८ लसूण पाकळ्या
१ टी स्पून लिंबूरस
मीठ चवीने
2 टे स्पून पाणी
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग
कृती: तवा गरम करून त्यावर 2 टे स्पून पाणी घालून हिरव्या मिरच्या, लसूण घालून त्यावर स्टीलची प्लेट ठेऊन दोन मिनिट तसेच मंद विस्तवावर ठेवा.
प्लेट काढून मिरच्या सुक्या होई परंत शिजू द्या. मग दगडीमध्ये मीठ, लिंबूरस व हिरव्या मिरच्या व लसूण काढून थोडे जाडसर वाटुन घ्यावे व एका वाटी मध्ये काढून घ्यावे.
एका फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी व हिंग घालून, तडतडल्यावर कुटलेल्या मिरच्यांवर घाला. मिक्स करून भाकरी बरोबर सर्व्ह करा.
आरोग्यदाई लसणाची चटणी साहीत्य:
8-10 लसूण पाकळ्या
2 टे स्पून ओला नारळ (खोवून)
1/2 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ व लिंबूरस चवीने
कृती: लसूण सोलून घ्या. ओला नारळ खोवून घ्या. एका दगडीमध्ये लसूण ठेचून घ्या मग त्यामध्ये ओला नारळ घालून थोडा कुठून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ व लिंबूरस घालून मिक्स करून परत थोडे कुटून घ्या.
लसणाची चटणी भाताच्या पेज बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.
The text of this Recipe in English Language can be seen here: Maharashtrian Traditional Green Chili Thecha And Garlic Chutney
The Recipe of this Video can be seen here: महाराष्ट्रियन स्टाईल पारंपारिक हिरव्या मिरची च खर्डा व आरोग्यदाई लसूण चटणी