Brahma Kamal (Bethlehem lily) Importance And Benefits

Brahma Kamal (Bethlehem lily) Importance And Benefits
Brahma Kamal (Bethlehem lily) Importance And Benefits

ब्रह्मकमळ फुलाचे महत्व माहिती व औषधी गुणधर्म

Brahma Kamal (Bethlehem lily) Importance And Benefits

ब्रह्मकमळ हे पवित्र फूल मानले जात. ज्याचा घरामद्धे हे फूल उमलते ती व्यक्ती भाग्यशाली मानली जाते व भगवान ब्रहाजीचा आशीर्वाद समजले जाते. ब्रह्मकमळ हे एक औषधी फूल आहे. ब्रह्मकमळ हे फूल विकले जात नाही किंवा खरेदी सुद्धा केले जात नाही. ते कोणी भेट म्हणून दिले तर ते आपल्याला जास्त लाभते. धार्मिक मान्यता नुसार ब्रह्म कमळ हे भगवान विष्णु ह्याच्या नाभी पासून तयार झालले फूल आहे व त्यावर भगवान ब्रह्म हे विराजमान आहेत असे म्हणतात.
रात्री ब्रह्म कमळ फुलले की ते आपल्या मुख्य दरवाजावर लावावे म्हणजे वाईट शक्ति किंवा वाईट नजर ह्यापासून मुक्ती मिळते वस्तुदोष दूर होतो.

Brahma Kamal (Bethlehem lily) Importance And Benefits
Brahma Kamal (Bethlehem lily) Importance And Benefits

ब्रह्मकमळ हे खूप छान व पवित्र फूल मानले जात. ज्याचा घरामद्धे हे फूल उमलते ती व्यक्ती भाग्यशाली मानली जाते व भगवान ब्रहाजीचा आशीर्वाद समजले जाते. ब्रह्मकमळ हे फूल खूप आकर्षक व दिसायला फार सुंदर दिसते. ब्रह्मकमळ (शास्त्रीय नाव: Epiphyllum oxypetalum) हे कॅक्टस वर्गातील एक झुडुप आहे. कॅक्टस वर्गातील असूनही त्याच्या पानांना काटे नसतात.

ब्रह्मकमळ हे वर्षातून एकदाच येते व रात्री 9 वाजता उमलायला लागते व 2 तासात पूर्ण उमलते
. ब्रह्मकमळ हे एक औषधी फूल आहे ते सुकवून त्याच्या पासून कॅन्सर च्या रोगावर औषध बनवले जाते. त्याच्या निघणार्‍या पाण्याच्या सेवनाने आपली तहान भागते व खूप जुना खोकला बारा होतो. जेव्हा ब्रह्मकमळ फुलते तेव्हा त्याच्या मध्ये ब्रह्म देव किंवा त्रिशूलची आकृती पहायला मिळते. ज्याच्या घरामद्धे ब्रह्म कमळ फुलते ती व्यक्ती भाग्यशाली मानली जाते व त्याला सुख समृद्धी मिळते असे म्हणतात. ब्रह्मकमळ हे फूल विकले जात नाही किंवा खरेदी सुद्धा केले जात नाही. ते कोणी भेट म्हणून दिले तर ते आपल्याला जास्त लाभते. ब्रह्म कमळ फूल फक्त देवाच्या चरणात अर्पण केले जाते किंवा कोणाला भेट म्हणून दिले जाते.

धार्मिक मान्यता नुसार ब्रह्म कमळ हे भगवान विष्णु ह्याच्या नाभी पासून तयार झालले फूल आहे व त्यावर भगवान ब्रह्म हे विराजमान आहेत असे म्हणतात. ब्रह्मकमळ माता नंदा ह्याचे प्रिय फूल आहे. म्हणून हे फूल नंदाअष्टमी ह्या दिवशी तोडतात व हे फूल तोडण्याचे काही नियम सुद्धा आहेत. असे म्हणतात की देवी द्रोपदीने ब्रह्मकमळ ह्या फुलासाठी हट्ट केला होता तेव्हा भगवान भीम यांनी ते फूल हिमालयमध्ये जाऊन आणले होते.

ब्रह्मकमळ ह्या फुलाला उत्तराखंड मध्ये ब्रह्म कमळ म्हणून मानतात तर हिमाचल प्रदेशमध्ये दुधाफूल तर कश्मीरमध्ये गलगल व उत्तर पश्चिम मध्ये बरगनडटोगेस म्हणून ओळखतात. ब्रह्म कमळ हे साधारणपणे जून ते सप्टेबर ह्या महिन्यात किंवा काळात येते.

ब्रह्मकमळ हे आता बर्‍याच ठिकाणी पहायला मिळते ते आपण घरी कुंडीमध्ये किंवा बागेमध्ये सुद्धा लावू शकतो. ब्रह्मकमळ झाडाचे एक पान कुंडीमध्ये लावले तरी ते छान बहरते. असे म्हणतात की रात्री ब्रह्म कमळ फुलले की ते आपल्या मुख्य दरवाजावर लावावे म्हणजे वाईट शक्ति किंवा वाईट नजर ह्यापासून मुक्ती मिळते वस्तुदोष दूर होतो. रात्री ब्रह्मकमळ हे फूल उमलले की त्याची पूजा करून म्हणजे फूल देव्हार्‍यात ठेवून हळद कुकु लावून दिवा व आगरबती लावून देवाला श्रद्धेने अर्पण करावे त्यामुळे आपल्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतात असे म्हणतात.

ब्रह्मकमळ हे फूल खूप औषधी सुद्धा आहे त्याच्या पासून आपल्याला फायदे सुद्धा होतात.

ताप आला असेल तर त्यावर गुणकारी आहे.
ब्रह्मकमळ फुलाचा अर्क काढून एक चमचा दिवसातून दोन वेळा घेतल्यास ताप दूर होतो.

यूटीआईच्या त्रासातून मुक्त होतो
जर महिलाना युरीन इन्फेक्शन झाले असेल तर त्यासाठी ह्या फुलाचा अर्क सेवन करावा.

लीवर इन्फेक्शनसाठी फुलापासून सूप बनवून त्याचे सेवन करतात.

भूक लागत नसेलतर ह्या फुलाचे सेवन करावे कारण त्यामध्ये पोषक तत्व आहेत त्यामुळे भूक लागते.

हाडाचे दुखणे किंवा सर्दी खोकला ह्यावर खूप फायदेमंद आहे ह्यामध्ये फुलाचे सेवन करावे त्यामुळे सर्दी खोकला लवकर बारा होतो.

शरीरावर काही जखम झालीतर ह्या फुलाचा रस लावतता त्यामुळे जखम लवकर बारी होते.

ब्रह्मकमळह्या फुलाचे औषधी गुणधर्म आहेत पण त्याबरोबर आपले नेहमीचे औषध सुद्धा चालू ठेवावे.

The Video of this text can be seen here: Brahma Kamal (Bethlehem lily) Importance And Benefits

Published
Categorized as Tutorials

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.