कुरकुरीत पोट्याटो तिकोना बाईट्स फॉर स्टार्टर रेसिपी
Tasty Crispy Potato Tikona Bites For Starter Recipe
कुरकुरीत पोट्याटो तिकोना बाईट्स फॉर स्टार्टर ही एक मस्त टेस्टी डिश आहे. पोट्याटो तिकोना बाईट्स बनवायला अगदी सोपे झटपट होणारे आहेत. अचानक कोणी पाहुणे आले किंवा घरी पार्टी असेलतर अश्या प्रकारची डिश बनवायला अगदी मस्त आहे.
पोट्याटो तिकोना बाईट्स बनवण्यासाठी बटाटा, तांदळाचे पीठ काही स्पायसी साहीत्य वापरले आहे. पोट्याटो तिकोना बाईट्स कुरकुरीत बनवण्यासाठी वरतून मैदा पेस्ट लावून कॉर्न फ्लेस्क किंवा ब्रेडक्रम्ब्स किंवा टोस्ट चुरा लावून तळले आहेत त्यामुळे ते छान कुरकुरीत बनतात व चविस्ट लागतता.
पोट्याटो तिकोना बाईट्स आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video of this Potato Tikona Bites recipe can be seen on our YouTube Channel:Crispy Crunchy Potato Tikona Bites For Starter or Nasta Recipe
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहित्य:
3 मोठे बटाटे
1 टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
2 टी स्पून पावभाजी मसाला
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
1 टे स्पून तांदळाचे पीठ
1 टे स्पून कॉर्न फ्लौर
1 टी स्पून चिली फ्लेस्क (एछिक)
मीठ चवीने
2 टे स्पून कोथबिर
1 टी स्पून लिंबूरस
तेल तळण्यासाठी
तिकोना बाईट्स आवरणासाठी:
2 टे स्पून मैदा
4 टे स्पून पाणी
मीठ चवीने
1/2 कप कॉर्न फ्लेक्स (चुरा करून)
1/2 कप टोस्ट चुरा किंवा ब्रेडक्रम्ब्स
कृती: प्रथम बटाटे उकडून, सोलून किसून घ्या. आल-लसूण पेस्ट करून घ्या. कोथबिर चिरून घ्या. मैदयाची पेस्ट बनवून घ्या. टोस्ट किंवा ब्रेड किंवा कॉर्न फ्लेक्सचा चुरा करून घ्या.
एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा घेवून त्यामध्ये आले- लसूण पेस्ट, काश्मिरी लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लौर, मीठ, चिली फ्लेक्स, कोथबिर, लिंबूरस घालून मिक्स करून त्याचा एक गोळा बनवून घ्या.
एका स्टीलच्या प्लेटला तेल लावून बनवलेला गोळा एकसारखा थापून घ्या. मग प्लेट फ्रीजरमध्ये एक तास ठेवा म्हणजे ते छान सेट होईल. एक तास झाल्यावर प्लेट बाहेर काढून त्रिकोणी कापून घ्या. तिकोना बाईट्स आपण हवा बंद डब्यात ठेवून फ्रीजरमध्ये 2-3 दिवस ठेवून मग सुधा वापरू शकतो.
कढईमद्धे तेल गरम करायला ठेवा. एक त्रिकोण घेवून मैदयाच्या पेस्टमध्ये बुडवून कॉर्नफ्लेक्सचा चुरामध्ये घोळून घ्या. थोडे त्रिकोण अश्या प्रकारचे बनवून घेवून प्लेटमध्ये ठेवा. थोडे त्रिकोण मैदा पेस्टमध्ये बुडवून मग टोस्ट किंवा ब्रेडमध्ये घोळुन घेवून बाजूला ठेवा.
कढईमद्धे तेल चांगले गरम झालेकी त्यामध्ये त्रिकोण तळून घ्या. तळताना प्रथम विस्तव मोठा ठेवा मग माध्यम आचेवर ठेवून छान ब्राऊन रंगावर कुरकुरीत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व त्रिकोण तळून घेवून टिशू पेपरवर ठेवा.
गरम गरम पोट्याटो तिकोना बाईट्स टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
The text Recipe of Potato Tikona Bites in English Language can be seen here: Tasty Cranchy Potato Tikona Bites For Nashta