2 चमचे तुपात झटपट सोपा इन्स्टंट मुगाच्या डाळीचा हलवा शिरा
How To Make Zatpat Instant Moong Dal Halwa Or Sheera Recipe In Marathi
मुगाच्या डाळीचा शीरा किंवा हलवा म्हंटले की आपल्या डोळ्या समोर येते की भरपूर साजूक तूप घालून व ड्रायफ्रूट घालून बराच वेळ मुगाची वाटलेली डाळ भाजत राहायचे.
आपण ह्या विडियोमध्ये अगदी कमी वेळात झटपट अगदी कमी तुपात डाळ न भिजवता हलवा अथवा शिरा बनवणार आहोत. आपण मुगाच्या डाळीचा शीरा सणावाराला किंवा कोणी पाहुणे येणार असतीलतर झटपट बनवू शकतो.
The Marathi language video of this Instant Moong Dal Halwa or Sheera can be seen on our YouTube Channel: How to make Instant Moong Dal Halwa Or Sheera
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1/2 कप मूग डाळ
1/2 साखर
1/2 कप दूध
2 टे स्पून तूप
2 टे स्पून क्रीम
1/2 टी स्पून वेलची पावडर
3-4 बदाम, 7-8 काजू व किसमिस सजावटीसाठी
कृती: प्रथम डाळ स्वच्छ धुवून 10 मिनिट झाकून बाजूला ठेवा. 10 मिनिट नंतर डाळ हातानी हलवून घ्या.
कढईमद्धे 1 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये काजू व बदाम तळून घेवून बाजूला ठेवा.
मग त्याच कढईमद्धे मुगाची डाळ घालून मंद विस्तवावर ब्राऊन रंगावर परतून घ्या. डाळ परतून झाल्यावर बाजूला काढून घेवून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
मग त्याच कढईमद्धे अजून एक चमचा तूप घालून वाटलेली डाळ घालून 2 मिनिट परतून घेवून त्यामध्ये 2 टे स्पून फ्रेश क्रीम घालून मिक्स करा. 2-3 मिनिट मंद विस्तवावर डाळ गरम करून त्यामध्ये हळू हळू गरम दूध घालत हलवत रहा. डाळ छान फुलून येईल. मग त्यामध्ये साखर घालून मिक्स कारून 3-4 मिनिट मंद विस्तवावर साखर पूर्ण वीरघळे पर्यन्त मंद विस्तवावर ठेवून वेलची पावडर व थोडे ड्राय फ्रूट घालून मिक्स करून विस्तव बंद करा.
2 चमचे तुपात झटपट इन्स्टंट मुगाच्या डाळीचा हलवा शिरा आपला सर्व्ह करण्यासाठी तयार आहे वरतून थोडे ड्रायफ्रूट घालून सजवून सर्व्ह करा.
गरम गरम झटपट इन्स्टंट मुगाच्या डाळीचा हलवा शिरा सर्व्ह करा.