चांगली शांत गाढ झोप येण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स किंवा घरगुती उपाय विडियो इन मराठी
Most Powerful Home Remedies and Tips for Peaceful Sleep
The Marathi language video of this Home Remedies and Tips for Peaceful Sleep can be seen on our YouTube Channel: Most Powerful Home Remedies and Tips for Peaceful Sleep
झोप ही सर्वांना प्रिय आहे. काही जणांना अगदी बेडवर पडल्या पडल्या झोप लागते तर काही जणांना लगेच झोप लागत नाही. त्यासाठी काही सोपे उपाय आहेत.
झोप न येण्याची बरीच कारणे असू शकतात. मानसिक ताण, कामाचे, नोकरीचे टेंशन, घरगुती प्रॉब्लेम, मुलांचे प्रॉब्लेम, काही आजार.
आपल्याला चांगली शांत झोप पाहीजे तर त्यासाठी काही सोपे घरगुती उपाय किंवा टिप्स आहेत त्या आपल्याला उपयोगी पडू शकतात.
1. रोज नियमित व्यायाम करायची सवय लावा. त्यामुळे चांगली झोप येते. पण झोपायच्या अगोदर व्यायाम करायचा नाही. तुम्ही संध्याकाळी करू शकता,
2 . आपल्या बेडरूम शांत व पूर्ण अंधार करून घ्या. आपली रोज झोपायची वेळ व सकाळी झोपेतून उठायची वेळ नियमित ठेवा. झोपण्या अगोदर आपल्या मांसपेशी रिल्यक्स करण्यासाठी थोडा वेळ शवासन केल्यास हितावाह आहे.
3.झोपण्याच्या वेळी आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा म्हणजे चांगली शांत झोप येईल.
4. काही वेळेस आपल्या दैनंदिन कामाच्या ताणामुळे आपल्याला झोप येत नाही तेव्हा बेडवर जाऊन झोपू नका. अश्या वेळी बेडरूम मध्ये बेडवर पडून झोप येण्याची वाट पाहू नका. जेव्हा झोप येते असे वाटत असेल तेव्हा बेडवर झोपायला जा.
5. रोज सकाळी एक निश्चित वेळेला झोपेतून उठा. व रात्री झोपताना सुद्धा ठराविक वेळेला झोपायची सवय लावा. म्हणजे बरोबर त्याच वेळेला झोप येते. अगदी लेट नाईट पार्टी, जागरण किंवा टेलिव्हीजन पाहू नका. जर दिवसा झोप आली तर रात्री लवकर झोप येत नाही.
चांगली शांत झोप लागण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत.
आपण चांगले चुंगले खातो त्याच बरोबर चांगली झोप पण आवशक आहे. जर आपली झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या स्वभावावर व आपल्या तब्येतीवर होतो. प्रेतेकला पुरेशी झोप हवी असते. त्यामुळे आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहते.
काही जणांना बेडवर झोपायला गेल्यावर लगेच झोप येते पण काहींना किती प्रयत्न केलातरी लवकर झोप येत नाही कारण काही कारणामुळे मन बेचैन असून काही समस्या असतील तर झोप सुद्धा पूर्ण होत नाही. अश्या वेळी आपण डॉक्टरचा सल्ला घेणे हितवाह आहे. जर डॉक्टरना तसेकाही दोष दिसले नाही तर आपली लाईफ स्टाईल कारणीभूत असते.
आजकाल प्रेतेकाचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे आपल्या रोजच्या जीवनात कामाचा ताण पण खूप आहे. प्रतेक ठिकाणी चढाओढ आहे. म्हणून जर आपली झोप पूर्ण होत नसेल तर आपल्याला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल. अश्या वेळी खाली दिलेल्या काही टिप्स किंवा उपाय लक्षात घ्या.
1. चेरी
चेरी मध्ये काही प्रमाणात मेलाटोनिन असते. त्यामुळे आपल्या आंतरिक शरीराचे आंतरिक चक्र नियमित होण्यासाठी मदद होते. काही एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की झोपण्या अगोदर एक मूठ चेरीचे सेवन केले तर शांत झोप लागते. चेरीचे ज्यूस घेतले तरी चालेल. जर फ्रेश चेरी नाही मिळाली तर फ्रोजन चेरी सुद्धा फायदेमंद आहे.
2. दूध
रात्री झोपण्याच्या अगोदर एक ग्लास गरम दूधाचे सेवन केले तर खूप फायदेशीर आहे. दूधामध्ये ट्रिप्टोफेन व सेरोटोनिन आहे त्यामुळे चांगली झोप येते. तसेच दुधामध्ये कैल्शियम आहे. गरम दुधाच्या सेवनाने मनावरील ताण दूर होतो.
3. केळी
केळ्या मध्ये असे एक तत्व आहे की त्याच्या मुळे मांस-पेशि अगदी तनावमुक्त होतात. केळ्यामध्ये मैग्निशियम और पोटैशियम आहे त्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. त्याच बरोबर विटामिन बी6 पण त्यामध्ये आहे जे झोपेच्या निगडीत हार्मोन्सच्या साठी सक्रिय भूमिका घेते.
4. बदाम
केळ्याच्या सारखेच बदाममध्ये सुद्धा मैग्निशयिम भरपूर प्रमाणात आहे. ज्यामुळे झोप येण्यास मदत होते व मांस-पेशिमध्ये होणारा तनाव कमी करता येतो. ज्यामुळे आपल्याला अगदी तनाव मुक्त झोप येवू शकते.
5. हर्बल चहा
चांगली झोप येण्यासाठी कैफीन व अल्कोहोल चे सेवन करणे चांगले आहे पण हर्बल चहा घेणे हे चांगली झोप येण्यासाठी योग्य आहे.
चांगली झोप येण्यासाठी अजून काही महत्वपूर्ण टिप्स:
1. रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या तळपायाला मोहरीच्या तेलाने मालीश करावे त्यामुळे छान झोप लागते व आपले डोके सुद्धा शांत राहते.
2. रात्री झोपताना आपले हात, पाय व चेहरा स्वच्छ धुवून आपला बेडवर सुद्धा स्वच्छ चादर घालावी त्यामुळे प्रसन्न वाटते व झोप लवकर येते.
3. रात्री झोपताना हलके संगीत किंवा गाणी आईकावी किंवा चांगले पुस्तक वाचावे. त्यामुळे सुद्धा लवकर झोप येते.
4. आपले डोके व मन शांत ठेवावे व सकारातमक विचार आणून मग बेडवर झोपायला जावे.