केसांच्या समस्या व घरगुती उपाय किंवा प्रभावी टिप्स
Home Remedies or Important Tips For Hair Problem In Marathi
The Marathi language video of this Home Remedies or Important Tips For Hair Problem can be seen on our YouTube Channel: Home Remedies or Important Tips For Hair Problem
केस ह्यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडते. लांब सडक व काळेभोर केस सर्वांना हवे असतात. पण आजकाल बिझी लाईफ स्टाईल मुळे केसांच्या समस्या खूप वाढल्या आहेत. केस कमजोर होणे, त्याची वाढन होणे, हार्मोन्समध्ये बदल होणे, योग्य आहार घेणे किंवा बाजारातील रासायनिक प्रॉडक्ट जास्त वापरणे ह्यामुळे आपले केस गळतात व केसांचे आरोग्य चांगले रहात नाही.
एक सोपा घरगुती उपाय करून बघा,
केसांना एलोवेरानि मसाज करा.
केसांनसाठी अगदी सौम्य शैम्पू वापरुन केस धुवा.
ऑलिव ऑईलनी केसांना मसाज करा.
आजकाल सर्वांचे जीवन खूप ढकाढ्कीचे झाले आहे बाहेर खूप पोल्युशन आहे धूळ व धूर आहे त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या केसांवर होतो. जर आपले केस तुटत असतील किंवा जास्त प्रमाणात गळत असतील अश्या समस्यासाठी स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे.
केस गळणे, तुटणे, कोरडे होणे ह्यासाठी काही घरगुती महत्वाच्या टिप्स किंवा उपाय आहेत.
1. कांदा: कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते. त्याच्या टिशू मधील कोलेजन मुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. कांद्याच्या रस काढून आपल्या केसांच्या मुळाशी लावून 10-15 मिनिट तसेच ठेवा मग अर्ध्या तासांनी माइल्ड शैम्पूनी केस स्वच्छ धुवा.
2. केसांना एलोवेरानी मसाज करा. एका आठोड्यात एकदा दोन चमचे एलोवेरा जूस घेवून मसाज करा. मसाज करतांना केसच्या मुळाशी मसाज करा मग अर्ध्या तासानी केस स्वच्छ धुवा.
3. कोरडे निस्तेज केस चांगले बनवण्यासाठी मेथीच्या दाण्याची पेस्ट बनवून लावा. त्यासाठी रात्री पाण्यामध्ये दोन चमचे मेथी भिजत घालून सकाळी मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. पेस्ट थोडी घट्ट पाहिजे मग केसांनवर लावून एक तासानी केस स्वच्छ धुवा.
4. केसांना ऑलिव ऑयलनी मसाज केले तर डोक्याचे रक्त अभिसरण चांगले होते केस रुक्ष होण्यापासून वाचतात, केस मजबूत बनतात, केस तुटत नाहीत. भृंगराजच्या तेलानी मसाज केले तर टकल पडत नाही व केस चांगले वाढतात.
5. लिंबाच्या रसानि सुद्धा केस गळणे थांबतात. लिंबाचा रस घेवून हलक्या हातांनी केसांच्या मुळा ला मसाज करा. त्यांनी सुद्धा बराच फायदा होतो पण हे आपल्याला बरेच दिवस करावे लागते. मग त्याचे परिणाम दिसून येतात.
6. केस चांगले वाढण्यासाठी अंडे वापरणे खूप फायदेमंद आहे. जर तुम्हाला अंड्याचा वास आवडत नसेल तर त्यामध्ये दही मिक्स करून लावा. त्यासाठी अंड्यातील पांढरा भाग घेवून त्यामध्ये दोन चमचे दही मिक्स करून केसांवर लावा मग 15 मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. अंड्यामद्धे आयोडीन जिंक, विटामिन बी असते त्यामुळे केस गळणे थांबन्यास मदत होते.
7. केसांना मजबूत बनवण्यासाठी केसांची रोजच्या रोज काळजी गेण्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. केसांवर ब्लीच, स्ट्रेटनर, डाई व कैमिकल्स लावण्यामुळे आपले केस रुक्ष होतात व जास्त प्रमाणात तूटतात. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कमीत कमी केमिकलचे प्रॉडक्ट वापरणे योग्य आहे.
काही महत्वाचे घरगुती उपाय आहेत त्यामुळे आपल्याला नक्की फायदा होईल
1. पपई: आपल्या केसांमध्ये कोंडा dandruff असेल तर केस बर्याच प्रमाणात गळतात त्यासाठी कच्च्या पपईचा लेप 10-15 मिनिट केसांवर लावा असे केल्यानी कसे कमी तूटतात.
2. केस गळण्याची समस्या साधारणपणे सर्वांमध्ये असते. महिलां बरोबर पुरुषांमध्ये सुद्धा अश्या प्रकारची समस्या दिसते. केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे पौस्टीक खाणे सेवन न करता फास्ट फूड खाणे. तसेच आपल्या रोजच्या बिझी लाईफमध्ये वेळेच्या अभावी खाण्याच्या वेळा व योग्य आहार घेतला जात नाही. आपल्या शरीरासाठी प्रोटीन, विटामिन, मिनरल्स ह्याची योग्य प्रमाणात आवशक्ता असते. त्यामुळे आपले केसांचे आरोग्य चांगले राहते. केसांच्या गळण्यामुळे सुंदर दिसणारी व्यक्ती पण चांगली दिसत नाही तसेच कमी वयात जास्त वय असलेले दिसू लागते. आता आपण बघूया की ह्या समस्या पासून आपण कसे वाचू शकतो.
3. नारळ हा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे. नारळाच्या दुधात प्रोटीन, फैट, आयर्न असते हे गुण नारळाच्या तेलात असतात. ते आपल्या केसाना मूळापासून टोका पर्यन्त शक्ती देतात व केस गळणे कमी करतात. आपण घरी नारळाचे दूध काढू शकतो. नारळाचे दूध काढून त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करून जेथे कमी केस आहेत किंवा टक्कल पडले आहे तेथे नारळाच्या दुधानी मालीश करा. रात्रभर तसेच ठेवा मग सकाळी केस स्वच्छ धुवा.
4. मेहंदी लावण्यानी सुद्धा होतो फायदा
मेहंदी आपण केसांना कलर करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. मेहंदी मुळे केसांना चांगला रंग येवून आपले केस सिल्की होतात. एक कप मेहंदी घेवून एक कप दहयामध्ये मिक्स करून केसांवर लावून पूर्ण सुकू द्या. नंतर केस स्वच्छ धुवून माइल्ड शैंपूने धुवा.
5. मध Honey
मधाच्या वापरानी सुद्धा केस गळणे थांबते. 1 चमचा मध, 1 चमचा लिंबूरस मिक्स करून केसांवर लावा मग अर्ध्या तासानी केस धुवा. हा उपाय आठोड्यातून एकदा केल्याने केस गळणे कमी होते किंवा त्यामध्ये दालचीनी पावडर मिक्स करून लावल्याने सुद्धा केस गळणे कमी होते.