झटपट ऑम्लेट बिना अंड्याचे मुलांसाठी रेसिपी विडियो इन मराठी
Tasty Zatpat Omelette Without Egg For Kids Recipe Video In Marathi
The Marathi language video of this Omelette Without Egg can be seen on our YouTube Channel: Zatpat Tasty Omelette Without Egg For Kids or For Nashta
आपण अंड्याचे ऑम्लेट बनवतो पण बीना अंड्याचे ऑम्लेट बनवले आहे का बनवून बघा खूप टेस्टी लागते. आपण अश्या प्रकारचे ऑम्लेट नाश्त्याला किंवा ब्रंचसाठी किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला पण मस्त आहे.
ऑम्लेट मुले अगदी आवडीने खातात आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करू शकतो. आपण ह्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या सुद्धा वापरू शकतो. त्यामुळे त्याची टेस्ट निराळी लागते व आपले पोट सुद्धा चांगले भरते.
चला तर मग आपण बघूया झटपट ऑम्लेट बिना अंड्याचे कसे बनवायचे.
साहित्य:
1 टे स्पून तेल
1 छोटा कांदा (चिरून)
1 टी स्पून आले (चिरून)
1 हिरवी मिरची (चिरून)
1 कप बेसन
2 टे स्पून मैदा
1/4 टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून जिरे पावडर
2 टे स्पून टोमॅटो (चिरून)
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
1 टी स्पून मीठ
2 छोटे बटाटे (उकडून, सोलून, चिरून)
1/2 टी स्पून बेकिंग पावडर
तेल ऑम्लेट बिना अंड्याचे फ्राय करण्यासाठी
कृती: प्रथम बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. कांदा, टोमॅटो, कोथबिर चिरून घ्या. आल किसून घ्या.
एका कढईमद्धे एक टे स्पून तेल घालून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या मग त्यामध्ये आले, हिरवी मिरची घालून मिक्स करून अगदी थोडेसे मीठ घालून परतून घ्या. विस्तव बंद करून घ्या.
एका बाउलमध्ये बेसन, मैदा, लाल मिरची पावडर, हळद, जिरे पावडर, कोथबिर, टोमॅटो मीठ चवीने घालून मिक्स करून त्यामध्ये लागेल तसे पानी घालून पीठ भिजवून घ्या. पीठ आपल्याला थोडे पातळ असे भिजवायचे आहे जसे आपण डोश्याचे बिजवतो तसे. मग त्यामध्ये परतलेला कांदा व उकडलेला बटाटा घालून मिक्स करून बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा घालून मिक्स करून 5 मिनिट बाजूला ठेवा.
नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा त्याला थोडेसे तेल लावून भिजवलेले मिश्रण डावानी घालून थोडे जाडसर घालून बाजूनी तेल सोडून भाजून घ्या. (थोडे जाडसर घातल्याने छान फुलून येते.) उलट करून दुसर्या बाजूनी सुधा थोडे तेल घालून भाजून घ्या.
गरम गरम झटपट ऑम्लेट बिना अंड्याचे मुलांना टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.