घरगुती उपाय चेहर्यावरचे नको असलेले केस कसे काढायचे
Home Remedies How To Remove Facial Hair
The Marathi language video of this Home Remedies How To Remove Facial Hair can be seen on our YouTube Channel: Simple Home Remedies How To Remove Facial Hair
आपल्या चेहर्यावर केस असतील तर आपल्या सौदर्यामध्ये बाधा येते व आपला चेहरा चांगला दिसत नाही आपण चेहर्या वरील नको असलेले केस काढण्यासाठी पार्लरमध्ये जातो पण सारखे सारखे पार्लरमध्ये जाणे जमत नाही त्यासाठी सहज सोपे घरगुती उपाय आहेत. ते आपण सहज अगदी कमी खर्चात व घरी बसून करू शकतो. आता जगभर लॉक डाउन चालू आहे पार्लरमध्ये जाणे सुद्धा धोक्याचे आहे तर आपण हे उपाय घरीच करू शकतो.
घरगुती उपाय चेहर्यावरचे नको असलेले केस कसे काढायचे अगदी सोप्या पद्धतीने ते पहा:
1. पोपई व हळद
साहित्य: 2 चमचे पोपईचा गर व 1/2 चमचा हळद
कृती: कच्ची पोपईची साल काढून त्याचे तुकडे करून मग मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट करून घ्या. मग त्यामध्ये हळद घालून मिक्स करून घ्या. मग चेहर्यवार जेथे केस आहेत तेथे ही पेस्ट लावून 10 मिनिट मसाज करा. मग पाण्यांनी चेहरा स्वच्छ धुवा. असे आठोड्यात 1-2 वेळा करा.
पोपईमद्धे पाएपेन असते त्यामुळे केसांच्या मुळाची छिद्र मोठी होतात व केस निघायला लागतात तसेच मृत त्वचा चांगली होण्यास मदत होते.
2. दलिया व केळे
साहीत्य: 2 चमचे द्लिया, एक पिकलेले केळे
कृती: द्लिया व केळ्याचे चांगले मिश्रण करून घ्या. मग पेस्ट आपल्या चेहर्यावर जेथे केस आहेत तेथे लावून 15 मिनिट मालिश करा व नंतर थंड पाण्यांनी चेहरा धुवा. असे आठवड्यातून एकदा करा त्यामुळे आपल्या चेहर्यावर चमक सुद्धा येते,
द्लियामध्ये एंटीऑक्सीडेंट असते. ते त्वचेची खाज व जलन ह्या समस्या दूर करते. म्हणून द्लियाचा प्याकचा चांगला उपयोग स्क्रब म्हणून केला तर नको आसलेले केस काढण्यास मदत होते तसेच आपली त्वचा मुलायम होते. द्लियामुळे आपली त्वचेला मॉइश्चर पण मिळते.
3. साखर, लिंबू व मध
साहीत्य: 2 चमचे साखर, 2 चमचे लिंबूरस, 1 चमचा मध, 1-2 चमचे मैदा किंवा मक्याचे पीठ, पाणी लागेलतसे व वैक्सिंग स्ट्रिप किंवा कपड़ा
कृती: लिंबूरस, साखर व मध मिक्स करून मिश्रण तयार करा. मग हे मिश्रण विस्तवावर 2-3 मिनिट गरम करा. मिश्रण गरम झाल्यावर ते वैक्स सारखे चिकट होईल. जर खूप चिकट झालेतर थोडेसे पाणी घालून शकता. मग मिश्रण थंड झाल्यावर चेहर्यावर जेथे केस आहेत तेथे मैदा किंवा मक्याचे पीठ लावून त्यावर साखरेचे मिश्रण लावावे मग वैक्सिंग स्ट्रिप किंवा कपडाच्या मदतीने केस काढावे. असे आपण आठोड्यातून 2 वेळा करू शकता.
चेहर्यावरील केस काढण्यासाठी अश्या प्रकारचे मिश्रण वैक्सिंग सारखे काम करते. फक्त ह्यामध्ये एक फरक आहे की आपण सर्व साहीत्य घरातील वापरतो. ज्याची त्वचा कोरडी आहे त्यांना हे फायदेमंद आहे. मधामध्ये मॉइश्चराइजिंग गुण असतात ते आपली त्वचा नरम ठेवते. पण मिश्रण जास्त गरम करू नका ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी हा प्रयोग करू नये. ज्यांना वैक्सिंग स्ट्रिप वापरता येत नाही त्यांनी दुसर्या कडून ज्याला माहिती आहे त्यांच्या कडून करून घ्यावे.
4 . साखर व लिंबूरस
साहीत्य: 2 चमचे साखर व 2 चमचे लिंबूरस
कृती: 8-9 चमचे पाणी, लिंबूरस व साखर मिक्स करून घ्या. मग हे मिश्रण गरम करा.
मिश्रण गरम झाल्यावर थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर आपल्या चेहर्यावर जेथे केस आहेत त्यावर लावा. 15-20 मिनिट तसेच ठेवा मग सुकल्यावर थंड पाण्यांनी हळू हळू रगडून काढा. असे आपण आठोड्यात 2 वेळा करू शकता.
असे केल्याने गरम साखर केसांना चिकटते व सुकल्यावर नको असलेले केस निघतात तसेच लिंबू मुळे आपली त्वचा चमकदार बनते व उजळते.
5. हळद व दूध
साहीत्य: 1चमचा हळद दूध लागेल तसे
कृती: दूध व हळद मिक्स करून त्याची पेस्ट बनवा मग चेहर्यावर जेथे केस आहेत तेथे पेस्ट लावा. मग सुकल्यावर गरम पाण्यांनी चेहरा धुवा. जर केस खूप दाट असतील तर मिश्रणामध्ये बेसन किंवा तांदळाचे पीठ घालून पेस्ट बनवा. हा प्रयोग आपण प्रतेक 20-22 दिवसांनी करू शकता
हळद व दूधचे मिश्रण आपल्या त्वचासाठी खूप फायदेमंद आहे. हळदीचा उपयोग एक्जिमा, एलर्जी किंवा त्वचा रोगच्या तक्रारीसाठी करू शकतो. तसेच त्यामध्ये एंटीसेप्टिक व एंटीबैक्टीरियल गुण आहेत. जेव्हा त्वचे वरील केस निघतील तेव्हा आपल्या त्वचेला काही नुकसान होणार नाही. हा प्रयोग केल्यावर लगेच साबण वापरू नये.