झटपट कोंकणी स्टाईल राइस खीर/ तांदळाची खीर रेसिपी
Delicious Konkani Style Rice Kheer / Tandalachi Kheer Recipe In Marathi
The Marathi language video of this Tandalachi Kheer can be seen on our YouTube Channel: Delicious Konkani Style Rice Kheer / Tandalachi Kheer
कोकणी राईस खीर ही आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे तसेच खूप टेस्टी सुद्धा लागते.
कोकणी स्टाईल राईस खीर बनवताना अगोदर भात बनवून घेतला आहे किंवा आपण नेहमी भात बनवतो त्यामधील थोडा भात खीर बनवायला वापरला तरी चालतो. त्यामुळे आपली खीर झटपट होते. खीर बनवताना नेहमी बासमती किंवा आंबेमोहर राईस वापरा. वेलची पावडर च्या आयवजी आपण रोज एसेन्स किंवा केवडा एसेन्स वापरू शकता.
राईस खीर आपण जेवणात किंवा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. मुले अश्या प्रकारची खीर अगदी आवडीने खातात. तांदळाची किंवा भाताची खीर पौस्टीक तर आहेच तसेच दिसायला सुद्धा आकर्षक आहे.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1/2 लिटर दूध
1/2 कप भात (शिजवलेला)
1/2 कप साखर (त्या पेक्षा थोडीशी कमी)
7-8 केसर काड्या
1/2 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ पावडर
3-4 बदाम, काजू, पिस्ता प्रतेकी (चिरून)
कृती: दूध गरम करून घ्या. मग त्यामध्ये शिजवलेला भात घालून चांगले मिक्स करून घ्या. गठूळ्या होता कामा नये. मग 10 मिनिट मंद विस्तवावर दूध गरम करून त्यामध्ये केसर व साखर घालून मंद विस्तवावर 2 मिनिट ठेवून वेलची पावडर, जायफळ पावडर, व थोडे ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या.
मग तयार झालेली राईस खीर बावऊलमध्ये काढून राहीलेले ड्राय फ्रूट घालून सजवून सर्व्ह करा.
आपण राईस खीर पुरी बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करून शकतो.