कुरकुरीत उडीद डाळ भजी
Crispy Tasty Urad Dal Bhaji Recipe
पावसाळा आला की आपण दुपारी चहा बरोबर मस्त पैकी गरम गरम वेगवेगळी भजी बनवतो. पावसाळा सीझनमध्ये भजी खाण्याची मजाच निराळी असते. आपण बटाटा, मिरची कांदा, पालक, मुगाची भजी अश्या प्रकारची भजी बनवतो.
उडीद डाळ भजी खूप टेस्टी व कुरकुरीत लागतात. आपण जेवणात किंवा नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो. उडीद डाळ भजी बनवायला अगदी सोपी आहेत. उडीद डाळ भजी बनवताना त्यामध्ये उडीद डाळ, हिरवी मिरची, आले, कोथबिर घातली आहे. आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video of this Urad Dal Bhaji can be seen on our YouTube Channel:Crispy Tasty Urad Dal Bhaji
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहित्य:
1 वाटी उडीद डाळ
1/2” आले
2 हिरव्या मिरच्या
1/2 टी स्पून जिरे
1/4 टी स्पून हिंग
1 टे स्पून कोथबिर (चिरून)
7-8 कडीपत्ता पाने (चिरून)
मीठ चवीने
तेल उडीद डाळ भजी तळण्यासाठी
कृती: प्रथम उडीद डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून 2 तास भिजत ठेवा.
उडीद डाळ भिजल्यावर पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घेवून त्यामध्ये आले, हिरवी मिरची घालून थोडे जाडसर वाटून घ्या. वाटलेली उडीद डाळ एका बाउलमध्ये काढून घ्या. मग त्यामध्ये चिरलेली कोथबिर, कडीपत्ता, हिंग, मीठ घालून चांगले फेटून घ्या. वाटलेले मिश्रण थोडे फ्लफी झाले पाहिजे.
एका कढईमद्धे तेल गरम करायला ठेवा. तेल चांगले गरम झालेकी गरम तेलात छोटी छोटी भजी घालून छान कुरकुरीत गोल्डन रंगावर तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व्ह भजी तळून घ्या.
गरम गरम भजी चहा बरोबर नाश्त्याला किंवा जेवताना सर्व्ह करा.