श्रावण शुक्रवार जिवतीची पूजा, माहिती व आरती विडियो इन मराठी
Shrawan Shukrawar Jiwati Puja, Mahiti Aarti
श्रावण शुक्रवार जिवतीची पूजा, माहिती, कहाणी व आरती आपल्या मुलांच्या सुखासाठी, आरोग्य व दीर्घायुषासाठी
The Marathi language video of this Shrawan Shukrawar Jiwati Puja, Mahiti, Kahani wa Aarti can be seen on our YouTube Channel: Shrawan Shukrawar Jiwati Puja, Mahiti, Kahani wa Aarti
श्रावण महिना चालू झाला की आपले सण वार चालू होतात. आपल्याला प्रसन्न वाटते, आपले मन, आपले घर, बाजूचा परिसर पण प्रसन्न वाटतो. आपल्याला उत्साह वाटायला लागतो. श्रावण महिन्यात प्रतेक दिवसाचे काहीना काही महत्व आहे. तसेच शुक्रवार सुद्धा महत्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी लक्ष्मी देवीच्या पूजे बरोबर जिवतीची पूजा करायची प्रथा आहे.
श्रावण महिना चालू झालाकी सुरवातीस कोणत्याही दिवशी म्हणजे मंगळवार, बुधवार, शुक्रवार किंवा शनिवार ह्या दिवशी जिवतीचे चित्र देव्हार्या जवळ भिंतीवर लावावे. मग प्रतेक शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. चित्राला रुईची 21 मण्याची माळ घालावी, हळद-कुंकू लावावे, आघाडा, हार किंवा फुले वाहावीत, तुपाचा दिवा, अगरबत्ती लावावी. गोड पदार्थ नेवेद्य म्हणून ठेवावा. दर शुक्रवारी थोडे पुरण करून त्याचे 5,7,9, किंवा 11 दिवे बनवून ते पूजेमध्ये ठेवावे.
चौथ्या शुक्रवारी पुराणपोळीचा नेवेदय बनवावा. त्यामध्ये वरण-भात, भाजी, भजी, चटणी, कोशिंबीर. लिंबू ठेवावे. संद्याकाळी सवाष्ण लेकुरवाळी बोलवावी तिची खणा-नारळाने ओटी भरावी व तिची लक्ष्मी समान पूजा करावी. तिच्या ताटा भोवती रांगोळी काढून तिला जेवावयास बसवावे. तसेच सवाष्णी महिलाना हळदी कुंकुवास बोलावून दूध, साखर व फुटणे देतात.
जिवतीची पूजा आपल्या मुलांच्या सुखासाठी, सुखरूपतेच्या साठी व दिर्घायुष्यासाठी करतात.
देवीची आरती म्हणावी. जिवती समोर आपल्या मुलांचे रक्षण कर असे म्हणावे, आपल्या मुलांचे आयुष्य सुखी जावे अशी प्राथना करावी. संद्याकाळी घरातील मुलांना ओवाळावे. मुले जर बाहेर गावी असतील तर घरात चारी बाजूनी आरती फिरवावी ती आरती आपल्या मुलांना पोचेल.जिवती आपल्या मुलांचे रक्षण करते.
श्रीजिवतीची आरती
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा ।
गृहांत स्थापूनि करुं पूजना ।
आघाडा दूर्वा माळा वाहूं या ।
अक्षता घेऊनि कहाणी सांगू या ॥ १ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
पुरणपोळीचा नैवेद्द दावू ।
सुवासिनींना भोजन देऊ ।
चणे हळददीकुंकू दूधही देऊं ।
जमुनि आनंदे आरती गाऊं ॥ २ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
सटवीची बाधा होई बाळांना ।
सोडवी तींतून तूंचि तयांना मातां ।
यासाठी तुजला करिती प्रार्थना ।
पूर्ण ही करी मनोकामना ॥ ३ ॥
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।
सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ. ॥
तुझिया कृपेने सौख्