कोकणी स्टाईल बिन पाकाचे रवा नारळ लाडू
Konkani Style Rava Naral Ladoo Without Sugar Syrup Recipe
आपण ह्या अगोदर रवा नारळ लाडू पाकातील कसे बनवायचे ते पाहिले आता आपण बिन पाकाचे रवा नारळ लाडू बिन पाकाचे तसेच बिना कडेन्स मिल्क कसे बनवायचे ते पाहूया.
महाराष्ट्रियन पद्धतीने रवा नारळ लाडू हे खूप प्रसिद्ध आहेत. रवा नारळ लाडू खूप छान टेस्टी व खमंग लागतात. बनवायला अगदी सोपे आहेत. आपण अश्या प्रकारचे लाडू दिवाळी फराळासाठी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो.
बिन पाकाचे रवा नारळ लाडू बनवतांना रवा, नारळ, दूध व साखर वापरली आहे त्यामुळे ते छान मऊ लुसलुशीत लागतात.
The Marathi language video of this Rava Naral Ladoo Without Sugar Syrup can be seen on our YouTube Channel: Rava Coconut Ladoo Without Sugar Syrup
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 10-12 लाडू बनतात
साहीत्य:
1 1/4 कप रवा
1 कप साखर
3/4 कप ओला नारळ किंवा डेसिकेटेड कोकनट
2 टे स्पून तूप
1 टे स्पून फ्रेश क्रीम
1/2 कप दूध
1/2 टी स्पून वेलची पावडर
थोडे ड्राय फ्रूट
कृती: कढईमद्धे तूप गरम करून त्यामध्ये रवा चांगला गुलाबी रंगावर मंद विस्तवावर खमंग भाजून घ्या. मग त्यामध्ये ओला नारळ घालून 5 मिनिट भाजून घ्या.
रवा छान खमंग भाजून झालकी त्यामध्ये साखर घालून दोन मिनिट गरम करून फ्रेश क्रीम व थोडे दूध घालून मिक्स करून घ्या. मग राहिलेले दूध घालून मिक्स करून साखर विरघळे पर्यन्त गरम करून घ्या. साखर विरघळलिकी त्यामध्ये वेलची पावडर व ड्राय फ्रूट घालून मिक्स करून घ्या. विस्तव बंद करून मिश्रण कोमट झालेकी त्याचे लाडू वळून घ्या.
रवा नारळ लाडू थंड झालेकी डब्यात भरून ठेवा.