होम मेड डिलीशियस शेवयाचा शीरा किंवा हलवा
Home made Sevai Sheera (Vermicelli Sheera) Or Halwa
होम मेड डिलीशियस शेवयाचा शीरा किंवा हलवा आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून बनवू शकतो. कोणी पाहून आलेकी आपण झटपट अश्या प्रकारचा शीरा बनवू शकतो. शेवयाचा शीरा खूप मस्त टेस्टी लागतो. बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे.
शेवयाचा शीरा बनवताना आपण कच्या शेवया तुपात भाजून घेवून शीरा बनवला तर खूप छान खमंग लागतो. शीरा बनवतांना दुधा आयवजी पाणी सुद्धा वापरू शकतो. तसेच ड्रायफ्रूट ने सजवून दिसायला सुद्धा आकर्षक दिसतो. लहान मुले अश्या प्रकारचा शीरा अगदी आवडीने खातात.
The Marathi language video of this Sevai Sheera (Vermicelli Sheera) Or Halwa can be seen on our YouTube Channel: Home made Sevai Sheera (Vermicelli Sheera) Or Halwa
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1 कप शेवया
2 कप दूध
1/4 कप साखर
1 टे स्पून तूप
1/2 टी स्पून वेलची पावडर
काजू बदाम किसमिस सजावटीसाठी
कृती: एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शेवया घालून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. दूध गरम करायला ठेवा.
शेवया भाजून झाल्यावर त्यामध्ये हळू हळू गरम दूध घालत मिक्स करत जा. हळू हळू सर्व दूध घाला. शेवया शिजल्यावर साखर व वेलची पावडर घालून मिक्स करा. साखर थोडी विरघळली की विस्तव बंद करून घ्या. साखर घातल्यावर विस्तववर शेवया जास्त वेळ ठेवल्यातर त्या कडक होतात मऊ राहात नाही.
शेवयाचा शीरा किंवा हलवा बाउलमध्ये काढून घेवून वरतून ड्रायफ्रूटने सजवा.
गरम गरम डिलीशियस शेवयाचा शीरा किंवा हलवा सर्व्ह करा.