घरगुती ब्युटि टिप्स व फेस पॅक भाग 1
Homemade Beauty Tips And Face Pack Part – I
खाद्य पदार्थ असो किंवा काहीही असो त्याला घरच्या बनावटीची सर येत नाही. आपण घरी बनलेली कोणतीही चीज स्वच्छ व शुद्ध असते. त्यासाठी आपण आपल्या चेहर्याची सुंदरता वाढवण्यासाठी काही होममेड ब्युटी टिप्स व फेस पॅक आहेत. त्या आपण घरी अगदी सहजपणे करू शकतो. अश्याच काही घरगुती टिप्स व घरगुती फेस पॅक कसे बनवायचे ते देत आहे.
The Marathi language video of this Homemade Beauty Tips And Face Pack Part – I can be seen on our YouTube Channel: Homemade Beauty Tips And Face Pack Part – I
मधाचा फेस पॅक, कडूलिंबाचा फेसपॅक, हळदीचा फेसपॅक, एलोवेरा जेल, बदाम तेल व बेसन
1 घरगुती ब्यूटी टिप्ससाठी मधाचा फेस पॅक
साहीत्य:
2 चमचे मुल्तानी माती
2 चमचे मध (honey)
पानी लागेल तसे
कृती: मुल्तानी माती, मध, व पानी मिक्स करून पेस्ट बनवून आपल्या चेहर्यावर लावा फक्त डोळ्याच्या खालचा भाग सोडून पेस्ट लावा. मग 15-20 मिनिट पेस्ट तशीच चेहर्यावर राहुद्या नंतर कोमट पाण्यांनी चेहरा धुवावा. चेहरा स्वच्छ धुतल्यावर मग मॉइस्चराइजर लावावे. एका आठोड्यात 1-2 वेळा हा फेस पॅक लावू शकता.
मुल्तानी माती आपला चेहरा मुलायम ठेवून चकाकी पण आणते. तसेच मध त्वचेला मॉइस्चराइज करायचे काम करते व चेहर्यावरील वया बरोबर वाढणार्या सुरकुत्या दूर करण्यासाठी मदत करते. म्हणूनच आपण घरगुती सोपी टीप वापरू शकता.
2. घरगुती ब्यूटी टिप्ससाठी कडूलिंबाचा फेसपॅक
साहीत्य:
4 कडू लिंबाची पाने
4 तुळशीची पाने
1/2 चमचा हळद
1/2 चमचा लिंबूरस
कृती: कडू लिंबाची पाने व तुळशीची पाने वाटून घ्या. मग त्यामध्ये हळद व लिंबुरस मिक्स करा. जर जरूरत पडलीतर त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करू शकता. आता बनवलेली पेस्ट आपल्या चेहर्यावर लावा. थोड्या वेळानी पेस्ट सुकल्यावर पाण्यानी आपला चेहरा स्वच्छ धुवावा. अश्या प्रकारचा फेसपॅक आपण आठोड्यातून 2-3 वेळा लावू शकतो.
कडू लिंबाची पानामद्धे एंटी-बैक्टीरियल व एंटीवायरल गुण असतात त्यामुळे आपल्या त्वचेसाठी फायदेमंद आहे व आपल्या त्वचेला कोणत्यापण त्वचा रोगापासून वाचू शकतो. तसेच ह्यामध्ये एंटी-एजिंग गुण आहेत त्यामुळे आपल्या चेहर्यावरील सुरकुत्या कमी होतात. ह्या मध्ये तुळशीच्या पानाचा उपयोग केला आहे. तुळशीच्या पानामध्ये रामबाण औषधी गुणधर्म आहेत. तो आपल्या त्वचेचा बर्याच गोष्टी पासून सावध ठेवते. ह्या पॅकमध्ये हळद आहे. हळद ही आपल्या त्वचेला दाग धब्बे, मुरूम, पुटकुळया पासून बचाव करते. तसेच हळद आपल्या स्कीनला स्कीन कॅन्सर होण्या पासून वाचवते. तसेच लिंबूरसच्या मुळे आपली स्कीन उजळून निघते. तुम्ही हा उपाय एकदा करून बघा नक्की आपल्याला ह्याचा फायदा दिसून येईल.
3. घरगुती ब्यूटी टिप्ससाठी हळदीचा फेसपॅक
साहित्य:
1-2 चमचे हळद
1 चमचा लिंबूरस जर तुमची त्वचा कोरडी असेलतर काकडीचा रस मिक्स करा
कृती: हळद लिंबूरस मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. पेस्ट लावण्याच्या अगोदर चेहरा स्वच्छ धुवून पुसून घ्या. मग आपल्या चेहर्यावर पेस्ट लावा. 10-15 मिनिट फेस पॅक तसाच ठेवा. मग थंड पाण्यानी चेहरा स्वच्छ धुवावा. आपण आठोड्यातून अश्या प्रकारचा फेस पॅक 2 वेळा लावू शकता.
हळद आपल्या स्कीनसाठी फायदेमंद आहे. हळदीमध्ये एंटी-माइक्रोबियल, एंटी-इंफ्लेमेटरी व अजून काही गुण आहेत तसेच चेहर्यावरील पिम्पल येण्यापासून बचाव करते. तसेच लिंबूरस मुळे आपली त्वचा निखारते.
4. घरगुती ब्यूटी टिप्ससाठी एलोवेरा जेल
एलोवेरा जेलसाठी आपण एलोवेरा म्हणजेच कोरफड झाडाचे पान घेवून कापून त्यामधून गर काढू शकतो. किंवा आपल्याकडे कोरफड नसेल तर आपण बाजारातून एलोवेरा जेल आणू शकता. रोज रात्री किंवा एक दिवसा आड आपण एलोवेरा जेल आपल्या चहर्यावर लावू शकतो.
एलोवेरा मध्ये म्यूकोपॉलीसैकराइड (Mucopolysaccharides) तत्व आहे. जे आपल्या स्कीनला हवेतील आद्रते पासून बचाव करते. त्यामुळे आपली त्वचा मऊ राहते. तसेच एलोवेरा शुष्क त्वचेला कोमल और मुलायम ठेवण्यास मदद करते. परत आपल्या चेहर्यावरील सुरकुत्या कमी करते.
5. घरगुती ब्यूटी टिप्ससाठी बदाम तेल
रोज रात्री आपल्या चहर्यावर व आपल्या अंगावर बदाम तेल लावावे. ते आपल्या स्कीनसाठी खूप फायदेमंद आहे. तसेच आपल्या त्वचा उजळ बनवते व चकाकी सुद्धा आणते. जर आपल्या त्वचेवर स्ट्रेच मार्क्स असतील तर त्यासाठी बदाम तेलाचा वापर करावा. त्यामुळे स्ट्रेच मार्क्सचे डाग कमी होण्यास मदत होते.
6. घरगुती ब्यूटी टिप्ससाठी बेसन
साहीत्य: 2 चमचे बेसन
एक चिमुट हळद
गुलाब जल जरूरी प्रमाणे
कृती: बेसन. हळद व गुलाबजल मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. मग पेस्ट आपल्या चेहर्यवार व गळ्यावर एक सारखी लावा. मग सुकल्यावर थंड पाण्यानी चेहरा धुवावा. जात तुमची त्वचा कोरडी असेलतर त्यामध्ये थोडी मलई मिक्स करा. अश्या प्रकारचा फेसपॅक कोणत्याही स्कीनसाठी उपयुक्त आहे. आपण आठोड्यातून 1-2 वेळा अश्या प्रकारचा फेसपॅक लावू शकता.
बेसन आपल्या चहर्यावर लावणे हा उपाय बर्याच वर्षा पासून केला जात आहे. बेसन हे आपल्या स्किनला टॉनिक सारखे उपयोगी आहे. ते आपली त्वचा अगदी खोल पर्यन्त साफ करते व आपली त्वचा उजळून निघते. गुलाब जल आपली त्वचा थंड ठेवते. व चेहर्यावरील जलन कमी करते.