अगदी नवीन पद्धतीने नारळ व मिल्क पावडर बर्फी रक्षा बंधनसाठी
Milk Powder Coconut Barfi For Raksha Bandhan Recipe
रक्षा बंधनला आपण नारळाची बर्फी किंवा वडी बनवतो. ह्या रक्षा बंधनाला आपण नवीन पद्धतीन नारळ बर्फी किंवा वडी बनवणार आहोत. ही अगदी पौस्टीक बर्फी किवा वडी आहे कारण ह्यामध्ये गव्हाचे पीठ, नारळ, व मिल्क पावडर आहे.
नारळ मिल्क पावडर बर्फी बनवताना गव्हाचे पीठ, डेसिकेटेड कोकनट, मिल्क पावडर वापरली आहे. नारळ व मिल्क पावडर बर्फी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. मिल्क पावडर वापरल्यामुळे खवा नाही वापरला तरी चालतो. तसेच कांडेन्समिल्क सुद्धा वापरले नाही.
नारळ मिल्क पावडर बर्फी आपण सणवाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो.
The Marathi language video of this Milk Powder Coconut Barfi or Vadi can be seen on our YouTube Channel: Milk Powder Coconut Barfi For Raksha Bandhan
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1 वाटी गव्हाचे पीठ
2 टे स्पून तूप
3/4 वाटी साखर
3/4 वाटी पाणी
3 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
3 टे मिल्क पावडर
1/2 टी स्पून वेलची पावडर
सजावटीसाठी काजू बदाम (जाडसर वाटून)
कृती: एका कढईमद्धे तूप गरम करून त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून मंद विस्तवावर 4-5 मिनिट भाजून घ्या. गव्हाचे पीठ भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट, मिल्क पावडर व वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.
कढईमद्धे साखर व पाणी घालून मिक्स करून एक तारी पाक बनवून घ्या. मग त्यामध्ये भाजलेले गव्हाचे पीठ घालून मिक्स करून घ्या.
एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून त्यामध्ये मिक्स केलेले मिश्रण घालून एक सारखे थापून वॉरतून ड्रायफ्रूट घालून एक सारखे करून घ्या. थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या.