मऊ लुसलुशीत 2 प्रकारचे रव्याचे मोदक गणपती बाप्पासाठी
Soft Delicious Suji Tutti Frutti Modak And Khajur Stuffed Modak
मोदक हे गणपती बाप्पाचे आवडतीचे खाद्य आहे. मोदक आपण बर्याच प्रकारे बनवू शकतो. आज आपण मोदक बनवताना जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. मोदक आपण गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थीला बनवू शकतो.
ह्या विडियो मध्ये आपण रव्याच्या मोदकाचे दोन प्रकार बनवणार आहोत. पहिला प्रकार मऊ लुसलुशीत रव्याचे टूटी फ्रूटी मोदक व दूसरा प्रकार आपण खजुर व ड्रायफ्रूटचे सारण भरून करणार आहोत. दोन्ही प्रकार बनवायला अगदी सोपे आहेत व झटपट होणारे आहेत.
The Marathi language video of this Soft Delicious Suji Tutti Frutti Modak And Khajur Stuffed Modak be seen on our YouTube Channel: Soft Delicious Suji Tutti Frutti Modak And Khajur Stuffed Modak
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 8 मोठ्या आकाराचे
साहीत्य:
1 वाटी रवा
2 1/2 वाटी दूध
1/2 वाटी साखर
3 टे स्पून तूप
1/2 टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून टूटी फ्रूटी
1/2 वाटी खजूर (बिया काढून)
2 टे स्पून काजू बदाम (तुकडे करून)
1/2 टी स्पून वेलची पावडर
कृती: खजूरच्या बिया काढून मिक्सरमध्ये थोडा वाटून घ्या व त्यामध्ये काजू बदामचे तुकडे घालूनमिक्स करून सारण बनवून घ्या.
एका कढईमद्धे तूप गरम करून त्यामध्ये रवा घालून मंद विस्तवावर 4-5 मिनिट भाजून घ्या. रवा भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
कढईमद्धे दूध गरम करून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून वीरघळून घ्या. साखर विरघळल्यावर त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून भाजलेला रवा घालून मिक्स करून 1 टे स्पून तूप घालून मिक्स करून थोडे घट्ट होई पर्यन्त शीजवून घ्या. मग त्याचे दोन भाग करून घ्या.
टूटी फ्रूटी मोदक: पहिल्या भागात 2 टे स्पून टूटी फ्रूटी घालून मिक्स करून त्याचे एक सारखे गोळे बनवून मोदक च्या साच्यामध्ये मिश्रण भरून मोदक बनवून घ्या.
खजूर स्टफ मोदक: दुसर्या भागाचे एक सारखे गोळे बनवून घ्या. खजुराच्या सारणाचे पण तेव्हडेच गोळे बनवा. मग रव्याच्या बनवलेल्या गोळ्यामध्ये खजुराचे सारण भरून मोदक च्या मोल्ड मध्ये घालून मोदकचा शेप द्या.
आता आपले दोनी प्रकारचे मोदक तयार झाले आहेत.