गव्हाच्या पिठाचे गूळ घालून मोदक गणेशजीसाठी
Healthy Wheat Flour Jaggery Modak Gavachya Pithache Modak
मोदक हे गणपती बाप्पाना खूप आवडतात. आपण गणेश चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला अश्या प्रकारचे मोदक बनवू शकतो.
गव्हाच्या पिठात गूळ घालून बनवलेले मोदक फार चविष्ट व पौस्टीक लागतात. गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. तसेच अगदी आकर्षक सुद्धा दिसतात. त्यामध्ये ड्राय फ्रूट घालून बनवले तर त्याची टेस्ट अप्रतीम लागते.
The Marathi language video of this Healthy Wheat Flour Jaggery Modak Gavachya Pithache Modak be seen on our YouTube Channel: Healthy Wheat Flour Jaggery Modak Gavachya Pithache Modak For Ganesh Chaturthi
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
1/2 वाटी तूप
1 वाटी गव्हाचे पीठ
2 टे स्पून काजू, बदाम, पिस्ता थोडी जाडसर पावडर
1 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
1/2 टी स्पून वेलची पावडर
थोड्या केसर कड्या
3/4 वाटी गूळ
कृती: प्रथम काजू, बदाम, पिस्ता जाडसर पावडर बनवून घ्या. गूळ किसून घ्या.
एका पॅनमध्ये तूप घालून पातळ झालेकी त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून मिक्स करून छान खमंग होई पर्यन्त भाजून घ्या. मग त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर, वेलची पावडर, डेसिकेटेड कोकनट व केसर घालून मिक्स करून विस्तव बंद करा. मग त्यामध्ये किसलेला गूळ घालून चांगले मळून घ्या.
आता आपले मोदकाचे मिश्रण तयार झाले. मोदक मोल्ड घेवून त्याला तुपाचा हात लावून थोडे थोडे मिश्रण घालून घालून मोदक बनवून घ्या. मोदक झालेकी गणपती बाप्पाना नैवेद्य दाखवा.