बेकिंग सोडा व बेकिंग पावडर फरक काय आहे
Difference Between Baking Soda And Baking Powder
बेकिंग सोडा सोडियम बाइकार्बोनेट जो ओले व आंबट पदार्थ वरती रियेक्सन होऊन कार्बन डाइआक्साइड गॅस निघतो हा गॅस एअर बबल च्या रूपात जमा होऊन आपला पदार्थ स्पंजी बनतो. बेकिंग सोडाचा वापर करतांना त्याची रियेक्सन होण्यासाठी दही, ताक किंवा आंबट पदार्थ ह्याची आवश्यकता असते.
आपल्याला माहीत आहे का बेकिंग सोडा व बेकिंग पावडर ह्या मध्ये काय फरक आहे ते आज आपण जाणून घेऊ या
The Marathi language video of this Difference Between Baking Soda And Baking Powder can be seen on our YouTube Channel: Difference Between Baking Soda And Baking Powder
खर म्हणजे ह्या दोनी सोड्यांचा वापर आपण घरी करतो. बेकिंग सोडा व बेकिंग पावडर ह्या दोनी वेगवेगळ्या पावडर आहेत. बेकिंग पावडर ही बेकिंग सोडया पासून बनते. पण ह्या दोनीचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. बेकिंग पावडर ही बेकिंग सोडया पेक्षा जास्त असीडीक असते.
बेकिंग पावडरचे पॅकिंग झाल्या पासून फक्त 6 महीने लाईफ असते तर बेकिंग सोडाचे तसे नसते.
बेकिंग सोडा व बेकिंग पावडर ह्यामध्ये काय फरक आहे.
1) बेकिंग पावडर ही अगदी मुलायम असते जसा आपला मैदा असतो तशी व बेकिंग सोडा हा थोडा खरबरीत असतो म्हणजे जसे मीठ असते तसा.
2) बेकिंग सोडयचा वापर आंबट पदार्था बरोबर करतात. म्हणजे दही व लिंबुरस ह्या बरोबर वापरतात. आपण भटूरे किंवा नान बनवतो त्यामध्ये वापरतो. कारण आपण त्यामध्ये दही वापरतो. किवा ढोकला इडली बनवताना बेकिंग सोडा वापरतात कारण आपण त्यामध्ये लिंबू वापरतो. बेकिंग सोडा वापरताना सोडा घालून मिश्रण बाजूला ठेवू नये लगेच मिश्रण वापरावे.
बेकिंग पावडर ही जेथे पाण्याचा अंश आहे तेथे वापरतात. म्हणजेच बेकरी प्रॉडक्ट मध्ये वापतो. म्हणजेच आपण केक बनवतो तेव्हा ते ओव्हन मध्ये बेक केले जाते व त्यामध्ये ओलसर पणा येतो व आपला केक फुलायला लागतो.
3) बेकिंग सोडयाच्या आयवजी बेकिंग पावडर वापरू शकतो पण बेकिंग पावडर च्या आयवजी बेकिंग सोडा वापरू शकत नाही.
बेकिंग सोडयाचा वापर
1) बेकिंग सोडा आपण मैदा भिजवण्यासाठी व ड्रिक्स बनवण्यासाठी करतो.
2) बेकिंग सोडयाच्या वापरानी कपडे सुधा छान स्वच्छ निघतात.
3) बेकिंग सोडयाच्या वापराने टाईल्स सुधा छान निघतात.
4) आपली चांदीची भांडी व चांदीचे दागिने स्वच्छ व चमकदार करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग करू शकतो.
5) बेकिंग सोडा, लिंबुरस व पाणी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
आपण एगलेस केक बनवतो त्यामध्ये फक्त बेकिंग सोडा व बेकीग पावडरचा वापर करतो. पण दोन्ही सम प्रमाणात घ्यावे. जर केक बनवताना अंडी वापरतात तेव्हा फक्त बेकिंग सोडा वापरतात.
काही लोक डाळ किंवा चणे शिजवताना एक चिमुट बेकिंग पावडर वापरतात पण त्या आयवजी बेकिंग सोडा वापरावा.
बेकिंग सोडाचा जास्त वापर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे.