पारंपारिक कोकणी पद्धतीने ओल्या नारळाचे उकडीचे मोदक गणेश चतुर्थी स्पेशल
Traditional Kokani Style Naral Tandalache Ukadiche Modak Recipe
मोदक हे आपण गणेश चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थीला बनवतो किंवा इतर वेळी सुद्धा स्वीट डिश म्हणून बनवू शकतो. नारळाचे तांदळाच्या पिठाचे मोदक हे खूप स्वादीष्ट लागतात. तसेच तांदळाच्या पिठाचे मोदक दिसायला आकर्षक दिसतात व मऊ लुसलुशीत लागतात.
तांदळाच्या पिठाचे मोदक हे पौष्टिक आहेत. अश्या प्रकारचे मोदक महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात खूप लोकप्रिय आहे. तांदळाच्या पिठाचे मोदक आपण केळ्याचे पान किंवा हळदीचे पान वापरुन स्टीम करू शकतो. कोकण ह्या भागात हळदीचे पान वापरतात त्यामुळे मोदक खूप छान सुगंधी बनतता.
The Marathi language video of this Traditional Naral Tandalache Ukadiche Modak Recipe can be seen on our YouTube Channel: Traditional Maharashtrian Kokani Style Naral Tandalache Ukadiche Modak
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 21 मध्यम आकाराचे मोदक
साहित्य : सारणासाठी
२ मध्यम आकाराचे नारळ (खोवून)
१ १/२ कप गुळ व १/२ कप साखर
१ टी स्पून वेलची पावडर
१/२ कप सुकामेवा (काजू, बदाम (तुकडे करून) किसमीस)
आवरणासाठी :
२ कप तांदळाचे पीठ
२ टे स्पून मैदा
२ टे स्पून तेल
मीठ चवीने
कृती: सारणासाठी: ओला नारळ खाऊन घ्या. गूळ चिरून घ्या.
एका कढई गरम करायला ठेवा मग त्यामध्ये ओला नारळ घेऊन गूळ घालून मिक्स करून गूळ विरघले पर्यन्त गरम करून घ्या. गूळ विरघल्यावर व सारण थोडेसे चिकट झाल्यावर त्यामध्ये वेलची पावडर व ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या.
आवरणासाठी: एका जाड बुडाच्या भांड्यात 2 कप पाणी गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल किंवा तूप घालून चवीने मीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये तांद्ळाची पिठी व मैदा घालून मिक्स करून घ्या. मग त्यावर 1/2 कप साधे पाणी घालून झाकण ठेऊन अर्धा मिनिट गरम करून मग विस्तव बंद करा. भांडे तसेच एक मिनिट झाकून ठेवा.
तांदळाचे उकड दिलेले पीठ प्लेटमध्ये काढून घ्या. हाताला पाणी लावून पीठ चांगले मळून घ्या. मग त्याचे छोटे छोटे एक सारखे गोळे बनवून घ्या.
मोदक बनवण्यासाठी: मोदकचा साचा घेवून त्यामध्ये आवरणाचे पीठ भरून मध्ये पोकळी करून त्यामध्ये नारळाचे सारण भरून वरतून परत तांदळाचे उकडीचे पीठ लावून बंद करून घ्या. मग साचातून हळुवारपणे मोदक काढून प्लेटमध्ये ठेवा. अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या.
मोदक पात्रमध्ये 2 मोठे ग्लास पाणी गरम करून वरच्या चाळणीवर केळीचे पान किंवा हळदीचे पान ठेवून त्यावर बनवलेले मोदक ठेवून प्रतेक मोदकवर केसरची एक एक काडी ठेवा वरतून केळीचे पान ठेवून मोदक पात्रचे झाकण ठेवून 12-15 मिनिट उकड द्या. मग मोदक पात्रातून मोदक प्लेटमध्ये काढून वरतून तूप लाऊन गरम गरम मोदक गणपती बाप्पाना नेवेद्य दाखवा.