झटपट पौष्टिक पोहयाचे लाडू
Zatpat Healthy Poha Ladoo For Kids
पोहयाचे लाडू ही एक महाराष्ट्रियन लोकांची आवडती व लोकप्रिय डिश आहे. पोहयाचे लाडू एक मस्त पौष्टिक डिश आहे. बाळ कृष्णना अश्या प्रकारचे लाडू खूप आवडतात. तसेच मुलांना शाळेत जाताना किंवा शाळेतील छोट्या सुट्टीसाठी किंवा दुधाबरोबर द्यायला मस्त आहे. मुले व मोठी माणसे सुद्धा अगदी आवडीने खातील.
पोहयाचे लाडू बनवतांना पोहे, ड्रायफ्रूट, गूळ, खजूर वापरले आहे. गूळ व खजूर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. पोहयाचे लाडू बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत.
The Marathi language video of this Zatpat Healthy Poha Ladoo For Kids can be seen on our YouTube Channel: Zatpat Healthy Poha Ladoo For Kids
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 8 लाडू
साहीत्य:
½ वाटी पोहे
1/2 वाटी सुके खोबरे (किसून)
1 टे स्पून खसखस
1 टी स्पून तूप
8-10 बदाम
2 टे स्पून काजू
10 खजूर (बारीक चिरून)
1/2 वाटी गूळ (किसून)
1/2 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ
कृती: प्रथम खजूर धुवून बिया काढून चिरून घ्या. सुके खोबरे किसून घ्या. वेलची व जायफळ पावडर करून घ्या. गूळ किसून घ्या.
एका कढईमद्धे पोहे मंद विस्तवावर छान भाजून घ्या मग एका प्लेटमध्ये काढून घ्या. खसखस बाजून घ्या, सुके खोबरे भाजून घ्या. पोहे थंड झाल्यावर कुस्करून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. कढईमद्धे तूप गरम करून त्यामध्ये काजू व बदाम परतून घ्या. मग मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
एका बाउलमध्ये पोहे, सुके खोबरे, खसखस, बदाम-काजू मिक्स करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात गूळ, खजूर, वेलची पावडर व जायफळ घालून थोडेसे ब्लेण्ड करून घ्या. मग पोहयच्या मिश्रणात काढून एक सारखे मिश्रण करून त्याचे छोटे छोटे लाडू बनवा.
लाडू बनवून झाले की मग नेवेद्य दाखवा.