कुरकुरीत स्वीट कॉर्न पकोडा
Tasty Crispy Sweet Corn Pakoda
स्वीट कॉर्न पकोडा हे खूप छान कुरकुरीत लागतात. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. पावसाळ्याच्या सीझन मध्ये अश्या प्रकारची भजी तळून सर्व्ह करा.
स्वीट कॉर्नमध्ये जीवनसत्व “ए” , “बी” व “इ” भरपूर प्रमाणात आहे. तसेच खनिज व फायबर आहे त्यामुळे पचनपण व ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोलमध्ये राहते.
The Marathi language video of this Tasty Crispy Sweet Corn Pakoda can be seen on our YouTube Channel: Tasty Crispy Sweet Corn Pakora
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहीत्य:
1 कप स्वीट कॉर्न (किसून)
2 टे स्पून कोथबिर
2 लहान हिरव्या मिरच्या
1” आले
¼ टी स्पून हळद
½ टी स्पून लाल मिरची पावडर
4 टे स्पून कॉर्न फ्लोर
2 टे स्पून तांदळाचे पीठ
तेल तळण्यासाठी
मीठ चवीने
कृती: स्वीट कॉर्न किसून घ्या. कोथबिर चिरून घ्या. हिरवी मिरची आले कुटून घ्या.
एक बाउलमध्ये किसलेले स्वीट कॉर्न, कोथ =बिर, हिरवी मिरची व आले, हळद, लाल मिरची पावडर, कॉर्न फ्लोर, तांदळाचे पीठ व मीठ घालून मिक्स करून घ्या. पानी वापरायचे नाही.
कढईमद्धे तेल गरम करून घ्या. मग त्यामध्ये कॉर्न ची छोटी छोटी भजी घाला. मध्यम विस्तवावर छान कुरकुरीत भजी टाळून घ्या. अश्या प्रकारे सर्व भजी तळून घ्या.
गरम गरम स्वीट कॉर्न भजी टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.