सहज सोपे घरच्या घरी श्री गणेश विसर्जन 2020 कसे करायचे
Simple Ganesh Visarjan 2020 At Home
22 सप्टेंबर 2020 ह्या दिवशी श्री गणेशजी ह्याची स्थापना अगदी शांतपने व भक्ति भावाने केली। ह्या वर्षी महामारीच्या संकटाच्या कारणनि आपण अगदी साधेपणानि श्रीची स्थापना केली त्याच भक्ति भावानी व अगदी साधेपणानि आपल्याला घरच्या घरी श्री बाप्पाची प्रतिमा विसर्जित करायची आहे त्यासाठी काही सोप्या सहज गोष्टी लक्षात ठेवून आपण घरच्या घरी श्री गणपती बाप्पाचे विसर्जन करू या
गणेश भक्तांनी श्री गणेशजी चे विसर्जन करण्यासाठी घरा बाहेर पडू नये कारण आपल्याला गर्दी करायची नाही . गर्दी करणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे.
The Marathi language video of this How To Do Ganesh Visarjan At Home During Lack down can be seen on our YouTube Channel: How To Do Ganesh Visarjan At Home During Lack down
काही वर्षापासून पाण्यातील प्रदूषणाच्या कारणांनी बरेच जण ईको-फ्रेंडली गणपति ची स्थापना करतात. किंवा काही लोक घरीच मातीची गणेशजीनची प्रतिमा म्हणजेच मूर्ती बनवतात. व घरीच
विसर्जित करतात.
काही गणेश भक्त दिड दिवस किंवा 5 दिवस किंवा 7 दिवस किंवा 11 दिवस गणपतीची स्थापना करतात. 11 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थी ह्या दिवशी गणेशजी ची प्रतिमा विसर्जित करतात.
पण अनंत चतुर्थी ह्या दिवशी बरेच जण गणेशजीची प्रतिमा विसर्जित करतात. अशी परंपरा आहे.
जर तुम्ही सुद्धा आपल्या लाडक्या गणपती बापांचे विसर्जन लांब कुठे न करता आपल्या घरातच करू शकता. त्यासाठी फक्त खाली दिलेल्या गोष्टी लक्षात घेउन विधी पूर्वक विसर्जन करू शकता.
कसे करावे गणपति विसर्जन (Ganesh Visarjan)?
1. गणपति विसर्जन करण्या अगोदर श्रीची विधी पूर्वक पूजा अर्चा करून मंत्र म्हणून भोग दाखवावा.
2. एक लाकडाची पेटी घेऊन त्याला गंगा जल किंवा गोमूत्र पवित्र करून घ्या. मग घरातील महिला नी स्वास्तिक काढावे. मग त्यावर अक्षता ठेवून पिवळ्या किंवा गुलाबी रंगाच्या कापड घालावे. मग त्यावर गुलाबाच्या पाकल्यानी सजवावे.
3. पेटीवर चारी कोपऱ्याना सुपारी ठेवावी.
4. आता आपण ज्या जागेवर गणपती स्थापना केली आहे तेथून उचलून पेटीवर ठेवावे.
5. गणेश जी ना विराजमान केल्यावर पेटीवर फल, फूल, वस्त्र, दक्षिणा व पांच मोदक ठेवावे.
6. आता एक कापडाची पोटली बनवून त्यामध्ये थोडे तांदूळ, गहू, नाणी, पाच सुकामेवा ठेवून त्याचे पोटली बांधावी. असे का करायचे कारण की गणपती बापाना त्याच्या प्रवासात कोणत्या सुद्धा गोष्टीची परेशानी होऊ नये.
7. गणपति का विसर्जन करण्या अगोदर गणपती आरती म्हणावी व प्रार्थना करावी. व आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी विनवणी करावी. तसेच 10 दिवसात काही चूक झाली असेल तर माफी मागावी.
8. विजर्सन करण्याच्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा गणेश प्रतिमा बरोबर बाकी वस्तु फेकून न देता पूर्ण सन्मानानी हळू हळू विसर्जित करा.
असे सुद्धा घरच्या घरी सोप्या पद्धतीने विसर्जन करू शकता.
एक टब, बदली, टाकी ह्यामध्ये सुद्धा गणेशची मूर्ति विसर्जित करू शकता.
जेव्हा मूर्ती पूर्ण पणे विरघळेल तो पर्यन्त थांबा मग ते पाणी आपल्या बागेतील झाडाना किंवा कुंडीतील झाडाला घालू शकता. किंवा ह्या मातीमध्ये तुळशीचे रोप सुद्धा लावू शकता.