जास्वंदी फूलाचे औषधी गुणधर्म विडियो इन मराठी
Jaswand Fulache Gundharm (Hibiscus) In Marathi
जास्वंदीचे फूल हे गुणकारी व औषधी आहे. जास्वंदीच्या फुलामध्ये विटामीन “C”, मिनरल व एनटी ऑक्सिडेन्ट आहेत. जास्वंदीच्या फुलाच्या झाडाच्या मुळा पासून ते फुला पर्यन्त प्रतेक भागाचा औषधी म्हणून उपयोग होतो.
जास्वंदीचे फूल हे खूप पवित्र मानले जाते. जास्वंदीचे फूल हे श्री गणेशजी व काली माता यांना अर्पण केले जाते. जास्वंदीचे झाडा पासून बनवलेले औषध हे स्कीन व केसांसाठी फार फायदेशिर आहे.
The Marathi language video of this Jaswand Fulache Gundharm can be seen on our YouTube Channel: Jaswand Fulache Gundharm
आता आपण बघू या जास्वंदीचे फूल व पाने ह्याचे काय गुणधर्म आहेत.
1. 20 जास्वंदीची फूल व पान सुकवून त्याची पावडर करून घ्या. मग रोज एक ग्लास दुधामद्धे 1 चमचा पावडर मिक्स करून सेवन केल्याने स्मरणशक्ति वाढून त्या बरोबर रक्ताची कमतरता सुद्धा भरून येते.
2. चेहऱ्यावर जर मुरूम, डाग असतील तर जास्वंदीची फूल व पान पाण्यात वाटून त्यामध्ये मध मिक्स करून रोज मुरूम व डागावर लावावे.
3. जर तोंडामध्ये छाले आले तर जास्वंदीची पाने चावून खावीत.
4. तुम्हाला तुमचे केस छान चमकार व चांगले मजबूत बनवायचे असतील तर जास्वंदीची फूल वाटून त्याचा लेप केसांवर लावावा.
5. जास्वंदीची फूल पाण्यात उकळून त्याच्या पाण्यानी केस धुतल्यास केस गळण्याचे थांबते.
6. मेंदी, लिंबुरस व 15-20 जास्वंदीची पानाचा रस एकत्र करून केसाना लावल्यास केसांतील कोंडा निघून जातो. किंवा जास्वंदी फुलाचा रस काढून त्यात तिळाचे तेल समप्रमाणात घालून मिक्स करून गरम करून त्याचे तेल काढावे.
7. जास्वंदीची फूलानचा उपयोग शरीरावरील खाज, सूज कमी करण्यासाठी होतो.
8. लहान मुलांच्या शांपुसाठी जास्वंदीची फूलचा उपयोग केला जातो.
केसांच्या आरोग्यासाठी जास्वंदीची फूल खूप फायदेशीर आहेत.
1. जास्वंदीची पाने वाटून घ्या व त्याचा लगदा केसानवर लावा. मग दोन तासानंतर केस स्वच्छ धुवा असे नियमित करा त्यामुळे केसांचे आरोग्य उत्तम राहते. तसेच आपले डोके सुद्धा शांत रहाते.
2. जास्वंदीची फुलांचा रस काढून त्यांच्या बरोबरीने जवसचे तेल (ऑलिव्ह ऑइल) मिक्स करून गरम करून फक्त तेल राहील ते तेल थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवा व रोज केसांच्या मुळाशी लावा. त्यामुळे केस छान चमकदार व लांब होतील.