Kesanmadhil Uva Or likha Kadnyache Sope Grguti Upaay in Marathi

Kesanmadhil Uva Or likha Kadnyache Sope Grguti Upaay in Marathi
Kesanmadhil Uva Or likha Kadnyache Sope Grguti Upaay in Marathi

केसांनमधील उवा (जूँ) किंवा लिखा काढण्याचे सोपे घरगुती उपाय विडिओ इन मराठी

Home Remedies to remove lice from hair In Marathi

The Marathi language video of this Kesanmadhil Uva Or likha Kadnyache Sope Grguti Upaay can be seen on our YouTube Channel: Kesanmadhil Uva Or likha Kadnyache Sope Grguti Upaay

केसांनमध्ये उवा किंवा लिखा होण ही एक नेहमीची गोष्ट झाली आहे. केसांनमध्ये उवा झाल्या हे कोणाचे आईकले तरी आपल्या डोक्यात खाज यायला सुरवात होते जारी उवा असल्या किंवा नसल्या तरी खाज येते. शाळेत जाणाऱ्या मुला मुलींच्या डोक्यात हमखास उवा होतात. पण फक्त लहान मुलांच्याच डोक्यात नाहीतर मोठ्याच्या माणसांच्या डोक्यात सुद्धा होतात.
केसांमध्ये उवा किंवा लिखा का होतात किंवा त्याची कारण काय आहेत तसेच त्यावर घरगुती उपाय काय आहेत.

उवा व लिखा (head lice eggs) म्हणजे काय?
उवा (जूँ) ह्या आपल्या केसांमध्ये राहतात त्या परजीवी असतात म्हणून त्या आपले रक्त पिऊन जगतात. त्या अंडी देतात व एक डोक्यामधून दुसऱ्या डोक्यात सहजपणे जातात. कारण की त्या उड्या मारू शकतात किंवा उडू सुद्धा शकतात. त्यांची अंडी 8 दिवसांत परिपक्व होतात व नवीन उवा तयार होतात. त्यांची संख्या पटापट वाढत जाते. त्यांचे जीवन 21 दिवसांचे असते तसेच एक उ दिवसात एका वेळी 5 अंडी देते. उवा एक माणसापासून दुसऱ्या माणसाच्या डोक्यात वेगाने जाते त्यामुळे त्यांची संख्या वाढते. डोक्यात जास्त दिवस उवा राहिल्या तर आपल्या डोक्यात जखम होते, रक्त येते, खाज येते, पिंपल्स येतात व केस गळायला लागतात.

Kesanmadhil Uva Or likha Kadnyache Sope Grguti Upaay in Marathi
Kesanmadhil Uva Or likha Kadnyache Sope Grguti Upaay in Marathi

उवा होण्याचे लक्षण काय आहेत ? 
उवा (जूँ) जेव्हा आपल्या केसात येतात व त्या परिपक्व होऊन आपले रक्त प्यायला सुरवात करतात तेव्हा आपल्या डोक्यात खाज यायला सुरवात होते. तसेच केसांनमध्ये हालचाल होणे, बेचैन वाटणे, झोपताना त्रास होणे, केसांवर लिखा दिसणे, डोक्यात सारखी खाज येणे किंवा जखम होणे.

केसांमध्ये उवा का होतात? (What causes head lice)

खर म्हणजे उवा ह्या परजीवी आहेत. त्या एक डोक्यातून दुसऱ्या डोक्यात सहजपणे जातात. जर कोणाचा टॉवेल, कंगवा किंवा कपडे वापरले तर त्या सहज वाढतात.

केसांनमधून उवा (जूँ) काढण्याचा सोपे घरगुती उपाय काय आहेत? (How to treat head lice)

आपल्याला बाजारात उवा काढायचे बरेच प्रोडक्ट मिळतात. ज्याला जे प्रोडक्ट पसंद पडेल ते आणतात. तसेच उवा काढायचा साबण, कंगवा, शांपु किंवा डॉक्टर इलाज सुद्धा घेतले जातात. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही सोप्या घरगुती टिप्स आहेत त्याच्या नुसार उवा व लिखा केसान मधून काढू शकतो.
* लहान मुले उवा किंवा लिखा काढताना खूप रडतात. अश्या वेळी प्रथम केस ओले करून मग बारीक दातांचा कंगवा किंवा फणी घेऊन वरपासून ते खाल पर्यन्त कंगवा फिरवावा असे 2 ते 3 वेळा करावे.
* केसनामद्धे लिखा असतात तेव्हा त्या परिपक्व होण्यासाठी 5-7 दिवस लागतात. तेव्हा दोन आठवडे रोज दिवसातून 2-3 वेळ कंगव्यानी किंवा फणीने वर सांगितल्या प्रकारे विंचरावे म्हणजे उवा व लिखा निघून जातील.
* पण केसांमध्ये जास्तच उवा व लिखा असतील तर डॉक्टर कडून इलाज करून घ्या.

केसांनमधून उवा (जूँ) व लिखा काढण्याचे सोपे घरगुती उपाय (Head lice home remedies)

केसांमधील उवा (जूँ) काढण्याचा सोपा उपाय म्हणजे कंगव्यानि किंवा फणीने केसाच्या मुळा पासून ते केसाच्या टोका पर्यन्त विंचरणे. हा उपाय आपल्या आजीच्या काळा पासून आमळात आणला जातो आहे

• उवा (जूँ) मारण्यासाठी कडू लिंबाची पाने वापरा:
कडू लिंबाची पाने स्वच्छ धुवून त्याची पेस्ट बनवून ती केसांच्या मुळाशी लावावी. पेस्ट वाळल्यावर केस स्वच्छ धुवावे. मग ओल्या केसाना मुळा पासून कंगव्यानि किंवा फणीने विचरावे.

• केसांन मधून लिखा काढण्यासाठी टी ट्री ऑयल म्हणजेच आक्रोडचे तेल वापरावे.
रात्री झोपण्याच्या अगोदर टी ट्री ऑईल घेऊन केसांच्या मुळाशी चांगले मालीश कर मग सकाळी शैंपू ने केस स्वच्छ धुवा. मग बारीक कंगवा किंवा फणी घेऊन केस विंचरा. हयाणी केसांमधील लिखा काढण्यास मदत होते.

• उवा (जूँ) वाढण्या पासून कसे रोकावे. (Head lice prevention)
कपडे, टॉवेल, चादर गरम पाण्यात धुवावे किंवा लौंडरी मध्ये द्यावे.
• जर कोणाच्या डोक्यात उवा असतील त्याच्या शेजारी झोपण्याचे टाळावे.
• ज्यांच्या डोक्यात उवा अथवा लिखा आहेत त्यांचे कंगवे, ब्रश, किंवा केसांचे प्रॉडक्ट वापरू नये. जर सगळ्या उवा व लिखा निघून गेल्या असतील तर कंगवा फेकून द्या किंवा त्याला स्ट्रेलाइज करून वापरा.
• जर तुमच्या मुलांच्या डोक्यात उवा अथवा लिखा झाल्या असतील तर शाळेत पाठवू नका त्यामुळे उवानचे प्रमाण खूप वाढेल व इतर मुलांच्या केसानमध्ये सुद्धा होतील.

केसांमधील उवा अथवा लिखा काढण्यासाठी खालील उपाय करू नये.

उवा काढण्यासाठी कोणत्या सुद्धा स्प्रेचा वापर करू नये. त्यानी उवाचे प्रमाण काही कमी होत नाही.
ऑलिव ऑयल, मक्खन , पेट्रोलियम जेली किंवा मेयोनेज़ सारख्या पदार्था पासून उवा अथवा लिखा जात नाहीत. असे म्हणतात किंवा ह्या वास्तुनि उवा अथवा लिखा जातात पण तसे होत नाही.
तसेच ग्लिसरीन अथवा केरोसिन सारखे टॉक्सिक कम्पाउन्ड वापरू नये त्याच्या वापराने उवा किंवा लिखा मारण्याचा अजून तरी शोध लागला नाही उलट ह्याच्या वापरांनी आपल्या केसान मधील जखम व स्कीनला नुकसान होण्याचा संभव आहे.

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.