100 % गोरे बनण्याचा झटपट सोपा उपाय
100% Gore Bananyache Zatpat Sope Gharguti Upay
The Marathi language video of 100% Gore Bananyache Zatpat Sopa Gharguti Upay can be seen on our YouTube Channel: 100% Gore Bananyache Zatpat Sopa Gharguti Upay
गोरा रंग ह्या सर्वाना हवा असतो. तसेच आपली त्वचा गोरी होण्यासाठी आपण खूप प्रयत्न सुद्धा करत असतो. त्यासाठी आपण बाजारातून अगदी महागडे क्रीम आणतो. मग त्या क्रीमचा दुष्परिणाम आपल्या स्कीनवर होतो.
आपण कामा निमिताने घरा बाहेर पडतो. बाहेर प्रदूषण, ऊन व वातावरण ह्याचा आपल्या स्कीन वर परिणाम होतो व त्यामुळे आपल्या स्कीनचे सेल्स डेड होतात.
आपली स्कीन गोरी करण्यासाठी काही झटपट सोपे उपाय आपण स्वस्त व मस्तपणे करू शकतो. एक म्हण आहे की पी हळद व हो गोरी. हळद ही आपल्या स्कीनसाठी खूप उपयोगी आहे. आपल्याकडे विवाहच्या वेळी नवरा व नवरीला हळद लावायची रीत आहे. हळद लावन्यानी आपली स्कीन निर्जंतुक होऊन उजळ होते.
गोरे बनण्यासाठी प्रथम आपली स्कीन त्वचा स्वच्छ कशी करायची ते पाहू या.
त्वचा स्वच्छ करण्यासाठी एका मोठ्या आकाराच्या भांड्यात पाणी घेऊन त्याला उकळी येवू द्या. मग आपल्या डोक्यावर एक टॉवेल घेऊन आपल्या चेहरा झाकून घ्या. मग आपला चेहरा गरम भांड्यावर थोड्या अंतरावर घवून टॉवेलनी चेहरा व भांडे झाकून घ्या. विस्तव मंद ठेवा. मग 5 मिनिट वाफ घ्या. वाफ घेतल्यावर टॉवेलनी चेहरा स्वच्छ पुसावा.
मग आपला चेहरा अस्ट्रिंजेंट कापसावर घेऊन पुसून काढावा. म्हणजे आपली चेहऱ्याची स्कीन स्वच्छ होऊन चेहऱ्यावरील छिंद्र मोकळी होतील मग त्यावर खाली देलेले कोणते सुद्धा एक पॅक चेहऱ्यावर लावून 15-20 मिनिट ठेवावे मग स्वच्छ पाण्यानी चेहरा धुवावा.
1. हळद: हळद लावण्यानी आपल्या चेहरा उजळतो. चेहऱ्यावर डाग असतील ते निघून जातात. हळदीमध्ये कच्चे दूध मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावावे वाळल्यावर स्वच्छ पाण्यानी चेहरा धुवावा. असे आठ दिवस करावे नक्की फरक पडेल.
2. बेसन हे आपल्या स्कीनसाठी फार फायदेशीर आहे. बेसनाचा पॅक बनवताना त्यामध्ये दूध किंवा दही व थोडीशी हळद घालून मिक्स करून लावावा.
3. लिंबाच्या रसनी आपली स्कीन अगदी स्वच्छ होते. त्यामुळे चेहऱ्या वरील डाग निघून जातात. बेसन मध्ये लिंबू रस घालून त्याचा पॅक चेहऱ्यावर लावला तर त्यानी पण खूप फरक पडतो.
4. चंदन पावडर किंवा चंदन उगाळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळून थंड सुद्धा वाटते.
5. मुलतानी माती, चंदन पावडर, हळद व दूध किंवा गुलाब जल मिक्स करून चेहऱ्या वर लावल्याने चेहरा एकदम चमकदार होतो.
6. चारोळी व दूध पेस्ट बनवून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहरा तजेलदार होतो.
7. जर डोळ्याखाली काळी वर्तुळ आली असतील तर बटाट्याचे साल काढून त्याचे गोल गोल तुकडे किंवा चकत्या करून त्याने डोळ्याच्या खाली मालिश करा त्यामुळे काही दिवसातच काळी वर्तुळे कमी होतील
8. रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी गाजराचा ज्यूस घेतला तर त्यामुळे स्कीन छान मुलायम होते.
9. वयोमाना प्रमाणे आपली स्कीन लुज होते चेहरा पण थोडा सुरकुतल्या सारखा होतो तर पिकलेल्या केल्याचा गर मॅश करून चेहऱ्यावर लावावा सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवावा.
10. चेहरा चमकदार होण्यासाठी लिंबूरस व मध सम प्रमाणात घेऊन चेहऱ्यावर लावावा.