2 चमचे तुपात मुगाच्या डाळीचे पौस्टीक लाडू
Don Chamche Tup Mugachya Daliche Paushtik Ladoo In Marathi
मुगाची डाळ ही आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. तसेच ती पचायला हलकी सुद्धा आहे. ह्या अगोदरच्या विडियो मध्ये आपण मुगाच्या डाळीचा हलवा पाहिला आता आपण मुगाच्या डाळीचे लाडू बघणार आहोत.
The Marathi language video of Don Chamche Tup Mugachya Daliche Paushtik Ladoo can be seen on our YouTube Channel: Don Chamche Tup Mugachya Daliche Paushtik Ladoo
मुगाच्या डाळीचे लाडू हे छान खमंग लागतात व ते खूप पौस्टीक सुद्धा आहेत. लाडू बनवताना डाळ भिजत घालून खूप वेल भाजत बसायची गरज नाही. आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट लाडू कसे बनवायचे ते पाहू या.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 9-10 लाडू बॅनतात.
साहीत्य:
1 कप मुगाची डाळ
¾ कप गूळ (किसून)
¼ कप ड्राय फ्रूट काजू,बदाम, पिस्ते)
½ टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून साजूक तूप
कृती: प्रथम मुगाची डाळ धुवून चाळणीवर निथळत ठेवा. गूळ किसून घ्या.
मग एक कढई गरम करून त्यामध्ये डाळ घालून गोल्डन ब्राऊन होई पर्यन्त कोरडीच भाजून घ्या. डाळ भाजून झाल्यावर थंड करायला ठेवा.
डाळ थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.डाळ वाटून झाल्यावर त्यामध्ये गूळ घालून परत एकदा वाटून घ्या. म्हणजे मिश्रण चांगले
एक जीव होईल. मग त्यामध्ये वेलची पावडर, ड्राय फ्रूट घालून एकदा थोडेसे ग्राइंड करून घ्या.
मग वाटलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊन दोन टे स्पून साजूक तूप घालून चांगले मिक्स करून घ्या. मग त्याचे मस्त गोल गोल लाडू वळून घ्या.