बिना बुंदी झारा झटपट मोतीचूर लाडू | Boondi Motichur Ladoo
Perfect Motichoor Ladoo Without Ladle Recipe In Marathi
बुंदीचे लाडू किंवा मोतीचूर लाडू हे सर्वाना आवडतात. दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात. महाराष्ट्रात सनावाराला बुंदीचे लाडू बनवतात किंवा लग्न कार्य असेलतर हमखास अश्या प्रकारचे लाडू बनवतात.
The Marathi language video of Perfect Motichoor Ladoo Without Ladle can be seen on our YouTube Channel: Perfect Motichoor Ladoo Without Ladle
आपण बुंदीचे लाडू नेहमी झारा वापरुन बुंदी तळून घेऊन बनवतो पण आता बिना झारा झटपट बुंदी लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे बानवायचे ते पहा.
बुंदीचे लाडू बनवताना आपण बेसन वापरुन मग ते भिजवून मग बुंदी बनवतो मग पाक बनवून त्याचे लाडू करतो पण आता आपण चनाडाळ वापरुन त्याचे मोतीचूर लाडू बनवणार आहोत. अगदी नवीन पद्धतीने.
असे मोतीचूर लाडू आपण सनावाराला किंवा दिवाळीच्या फराळामध्ये बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 14-15 मध्यम लाडू बनतात
साहीत्य:
1 कप चनाडाळ
1 कप तूप किंवा रिफाईड तेल
½ टीस्पून वेलची पावडर
1 टे स्पून लाल भोपळा बी
1 टे स्पून काजू तुकडे
थोडे किसमिस
एक चिमूट केशरी किंवा ऑरेंज रेड रंग
पाक बनवण्यासाठी:
1 कप साखर
½ कप पाणी
1 चमचा तूप
कृती: प्रथम चनाडाळ चांगली धुवून 4-5 तास पाण्यात भिजत ठेवा. मग पाणी काढून डाळ चाळणीवर निथळत ठेवा. पाणी निघून गेल्यावर मिक्सरच्या भांड्यात डाळ व 1 टे स्पून पाणी घालून थोडी जाडसर वाटून घ्या. वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्या.
एका कढईमद्धे तूप किंवा तेल गरम करून त्यामध्ये वाटलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे टाकून गुलाबी रंगावर किंवा गोल्डन रंगावर तळून घ्या. सर्व गोळे तळून झाल्यावर थोडे थंड करायला ठेवा.
मग मिक्सरमध्ये जाड सर (बारीक आजिबात करायचे नाही) वाटून घेऊन बाउलमध्ये काढून घ्या. त्यामध्ये लाल भोपळ्याचे बी, काजू तुकडे, किसमिस, वेलची पावडर घालून मिक्स करा.
दुसऱ्या एका कढईमद्धे साखर व पाणी घालून दोन तारी पाक बनवून घ्या. पाक थोडा चिकट झालकी बोटावर घेऊन पहा तार येते का ते मग त्यामध्ये बुंदी घालून मिक्स करून घ्या. एक मिनिट विस्तव चालूच ठेवा.
मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर हाताला थोडेसे तूप लावून गोल गोल लाडू वळून घ्या. लाडू वळून झाल्यावर थंड झालेकी स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.