डिलीशियस पौष्टिक अळीव रवा लाडू
Delicious Nutritious Aliv Or Halim or Garden Cress Seeds Ladoo Recipe In Marathi
अळीव हे आपल्या सगळ्याच्या परिचयाचे आहेत. ते आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. विशेष करून महिलांसाठी जास्त उपयोगी आहेत. कारण आपल्या भारतात महिलांमध्ये शरीरातिल हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. त्यांनी जरूर आळीवचे सेवन करावे. अळीव हे आपल्या स्कीनसाठी, रक्त शुद्धीसाठी, पोटासाठी, तसेच केसांसाठी खूप उपयुक्त आहेत.
The Marathi language video of Delicious Nutritious Aliv Or Halim or Garden Cress Seeds Ladoo can be seen on our YouTube Channel of : Delicious Nutritious Aliv Or Halim or Garden Cress Seeds Ladoo
अळीवमध्ये लोह, कॅल्शियम व जीवनसत्व “क” आहे. तसेच रजःस्राव नियमित करते. अळीवमध्ये ॲंटिऑक्सिडंट्स असून रक्त शुद्ध करण्याचा गुणधर्म आहे. बाळंतिनिला दूध वाढण्यासाठी हळीवाचे लाडू किंवा खीर सेवन करायला देतात.
आळीवचे अश्या प्रकारचे लाडू 12-15 दिवस चांगले राहतात.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 20- 22 लाडू बनतात
साहीत्य:
1 वाटी अळीव
½ वाटी बारीक रवा
2 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
¼ वाटी बदाम पावडर (जाडसर)
2 टे स्पून तूप
½ टी स्पून वेलचीपावडर
थोडेशी जायफळ पावडर
कृती:
प्रथम अळीव निवडून घेऊन एका बाउल मध्ये घ्या मग त्यामध्ये ½ वाटी पेक्षा थोडेसे जास्त पाणी घालून 3 तास तसेच बाजूला झाकून ठेवा. बदाम मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. किंवा पाहिजेतर सुरीने पातळ काप करा.
एका कढईमद्धे रवा घेऊन मंद विस्तवावर 4-5 मिनिट गुलाबी रंगावर भाजून घ्या. रवा भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. मग डेसिकेटेड कोकनट थोडेसे गरम करून घेऊन बाजूला ठेवा.
तीन तास झाल्यावर नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये साजूक तूप गरम करून भिजवलेले अळीव घ्या मिक्स करून भाजलेला रवा, डेसिकेटेड कोकनट व गूळ घालून मिक्स करून मंद विस्तवावर मिश्रण थोडे घट्ट होई पर्यन्त हलवत रहा. गूळ पूर्ण विरघळला की त्यामध्ये वेलची पावडर व जायफळ व बदाम पावडर घालून मिक्स करून 2 मिनिट मिश्रण गरम करून घ्या. आता विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा.
आळीवचे मिश्रण कोमट झालेकी त्याचे छोटे छोटे लाडू वळून घ्या. थंड झाल्यावर डब्यात भ्रूण ठेवा.