सिम्पल होममेड एगलेस रवा-आटा नूडल्स मुलांसाठी
Simple Homemade Eggless Suji-Atta Noodles Recipe In Marathi
नूडल्स म्हंटल की लहान मुलांना खूप आवडतात. त्या आपण विविध प्रकारे बनवू शकतो. आपण बाजारातून नूडल्स आणतो. नूडल्स हा असा पदार्थ आहे की तो झटपट बनतो. पण आपण अश्या प्रकारच्या नूडल्स घरीच झटपट बनऊ शकतो त्यापण अगदी पौस्टीक.
The Marathi language video of Simple Homemade Eggless Suji-Atta Noodles can be seen on our YouTube Channel of: Simple Homemade Eggless Suji-Atta Noodles
नूडल्स बनवताना रवा, गव्हाचे पीठ वापरले आहे. मैदा आजिबात वापरला नाही. तसेच अंडे सुद्धा वापरले नाही. आपण घरी नूडल्स बनवल्या तर आपण बाजारच्या नूडल्स आणायला विसरून जाऊ.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 2 जणासाठी
साहीत्य:
2 कप रवा (बारीक)
1 कप गव्हाचे पीठ
मीठ चवीने
1 टी स्पून तेल
कृती: प्रथम रवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
एका बाउलमध्ये वाटलेला रवा, गव्हाचे पीठ व मीठ घालून मिक्स करा. मग थोडे थोडे पाणी वापरुन पीठ मळून घ्या. पीठ फार सैल नको थोडे घट्टसर पाहिजे. मळेलेले पीठ 15-20 मिनिट झाकून ठेवा.
आपल्याकडे किचन प्रेस म्हणजे स्टीलचा चकली सोऱ्या असेल तो नूडल्स करण्यासाठी वापरायचा नसेल तर अजून एक पद्धत आहे.
पहिली पद्धत: झाकून ठेवलेले पीठ 15 मिनिट नंतर काढून पोलपाटावर चांगले मळून घ्या. मग त्याचे एक सारखे तीन भाग करा. एक भाग घेऊन पोलपाटावर लाटून घ्या. मोठी पोळी लाटायची वरतून त्याला गव्हाचे पीठ लावा. मग पोळी निम्मी मुडपुन घ्या. म्हणजे फोल्ड करून त्यावर परत गव्हाचे थोडेचे पीठ लावा. परत एकदा फोल्ड करा. आता त्याच्या उभ्या पातळ पाट्या सुरीने कापा.एका प्लेटवर गव्हाचे पीठ भुरभुरा व त्या पातळ पट्या प्लेटवर काढा. अश्या प्रकारे सर्व एक सारख्या करून कापून घ्या.
दुसरी पद्धत: झाकून ठेवलेले पीठ काढून थोडे मळून घ्या. मग त्याची एक वळकुटी बनवून एक सारखे तीन भाग कापून घ्या. मग एक गोळा घेऊन वळकुटी बनवा. किचन प्रेस घेऊन त्याला आतून थोडेसे तेल लावून त्यामध्ये वळकुटी ठेवून शेवेची चकती लावून घ्या. एक प्लेट घेऊन त्यावर गव्हाचे पीठ भुरभुरून त्यावर किचन प्रेसने आपण जशी शेव पाडतो तशी शेव पाडा. अश्या प्रकारे सर्व शेव पाडून झालीकी हळुवार पणे मिक्स करा.
एका मोठ्या आकाराच्या भांड्यात 4-5 ग्लास पाणी गरम करायला ठेवा. त्यामध्ये 1 टी स्पून मीठ व एक टी स्पून तेल घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आलीकी त्यामध्ये नूडल्स घालून चांगली उकळी आलीकी 2-3 मिनिट मध्यम विस्तवावर नूडल्स शिजवून घ्या.
नूडल्स शिजल्याकी एका चाळणीवर काढून त्यावर 2-3 ग्लास पाणी घालून मग थंड करायला ठेवा. नूडल्स थंड झाल्याकी मग आपण त्यापासून व्हेज नूडल्स बनवू शकतो.