अगदी पारंपरिक स्पेशल कडकणी दुर्गा सप्तमीचे दागिने पूजेसाठी
Traditional Navratri Special Kadakani For Durga Saptami Pujan Recipe In Marathi
नवरात्रीमध्ये रोज देवीला काहीना काही गोड नेवेद्य दाखवतात. त्यामध्ये सप्तमी ह्या दिवशी गोड कडकण्या नेवेद्य म्हणून दाखवतात. अश्या प्रकारच्या कडकण्या बनवायला अगदी सोप्या आहेत तसेच झटपट होणाऱ्या आहेत. आपण कडकण्या रवा, मैदा व साखर घालून बनवू शकतो किंवा गव्हाचे पीठ व गूळ घालून सुद्धा बनवू शकतो.
The Marathi language video of Traditional Navratri Special Kadakani For Durga Saptami Pujan be seen on our YouTube Channel of: Traditional Navratri Special Kadakani For Durga Saptami Pujan
आज आपण मैदा, रवा व पिठीसाखर घालून अगदी पारंपारिक कडकण्या बनवणार आहेत.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 7-8 जणांसाठी
साहित्य:
1 कप मैदा
1 कप बारीक रवा
¾ कप साखर (पिठीसाखर)
¼ टी स्पून वेलची पावडर
मीठ चवीने
1 टे स्पून तेल (गरम मोहन)
तेल तळण्यासाठी
कृती: बारीक रवा, मैदा, मीठ, वेलची पावडर व मोहन घालून चांगले मिक्स करून घ्या. मग अगदी थोडेसे पाणी वापरुन पीठ घट्ट मळून घ्या. भिजवलेले पीठ झाकून 15-20 मिनिट झाकून ठेवा.
मग मळलेल्या पिठाचे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून छोट्या पुऱ्या लाटून घ्या. मग लाटलेल्या पुरीला काटे चमचानि टोचे मारून घ्या. अश्या प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घ्या.
एका कढईमद्धे तेल गरम करून घ्या. मग गरम केलेल्या तेलात गोल्डन रंगावर पुऱ्या छान तळून घ्या. सर्व पुऱ्या तळून झाल्याकी घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. किंवा लगेच देवी मातेला नेवेद्य दाखवा.