बिना मावा तांदळाच्या पिठापासून जबरदस्त मिठाई
Rice Flour Delicious Mithai For Dessert Recipe In Marathi
मिठाई हा गोड पदार्थ सर्वाना आवडतो. आपण सणवार ह्या दिवशी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. तसेच डेझर्ट म्हणून सुद्धा बनवू शकतो.
The Marathi language video of Rice Flour Delicious Mithai For Desert be seen on our YouTube Channel of: Rice Flour Delicious Mithai For Desert
मिठाई बनवताना तांदळाचे पीठ, दूध व मिल्क पावडर वापरुन बनवली आहे. तांदळाच्या पिठापासून बनवलेली मिठाई अगदी झटपट बनवता येते तसेच चवीला पण छान लागते. आपल्याला पाहिजे त्या टेस्टची बनवता येते. ह्या मिठाई मध्ये 3 प्रकार बनवले आहेत. रोज सीरप वापरुन, चॉकलेट सीरप व वेलची पावडर वापरुन बनवली आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहीत्य:
1 कप तांदळाचे पीठ
2 कप दूध
½ कप मिल्क पावडर
½ कप साखर
1 चमचा तूप
1 टे स्पून रोज सीरप
1 टे स्पून चॉकलेट सीरप
¼ टी स्पून वेलची पावडर
कृती: प्रथम चांगल्या प्रतीचे तांदूळ धुवून वाळवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. किंवा बाजारातून तांदळाचे पीठ विकत आणले तरी चालेल.
एक नॉनस्टिक पॅन घेऊन त्यामध्ये तांदळाचे पीठ घेऊन 5 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग एका प्लेट मध्ये काढून घ्या.
त्याच पॅनमध्ये तूप गरम करून दूध, साखर व मिल्क पावडर घालून मिक्स करून 5 मिनिट मंद विस्तवावर आटवून घ्या. मग त्यामध्ये भजलेले तांदळाचे पीठ घालून मिक्स करून 1-2 मिनिट झाकण ठेवून मग विस्तव बंद करा.
पिठाचे 3 भाग करा करून एकेका बाउल मध्ये ठेवा.
पहिल्या भागात रोज सिरप घालून चांगले मळून घेऊन त्याचे छोटे छोटे लांबट गोळे बनवून घ्या. सर्व लांबट गोळे बनवून घ्या.
दुसऱ्या भागात चॉकलेट सिरप घालून चांगले मळून घेऊन त्याचे छोटे छोटे लांबट गोळे बनवून घ्या. सर्व लांबट गोळे बनवून घ्या.
तिसऱ्या भागात वेलची पावडर घालून मळून घेऊन त्याचे छोटे छोटे लांबट गोळे बनवून घ्या. सर्व लांबट गोळे बनवून घ्या.
सजावटीसाठी: एका बाउलमध्ये डेसिकेटेड कोकनट घेऊन तिन्ही प्रकारचे गोळे त्यामध्ये रोल करून घ्या. मग तयार झालेली मिठाई वेगवेगळ्या बाउलमध्ये ठेवा. मग सर्व्ह करा.