मैगी पासून एकदम नवीन जबरदस्त नाश्ता मुलांसाठी
Tasty Crunchy Maggi Pakoda For Kids Nasta Recipe In Marathi
मॅगी म्हंटले की मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. मॅगी ही सर्वात मुलांची आवडती डिश आहे. आता आपण मॅगी पासून एक जबरदस्त नवीन नाश्ता बनवणार आहोत. अश्या प्रकारची डिश लहान मुले काय मोठे सुद्धा अगदी आवडीने खातील.
मॅगीचा अश्या प्रकारचा नाश्ता बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. आपण नाश्ता किंवा जेवणात साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो.
The Marathi language video Tasty Crunchy Maggi Pakoda For Kids Nasta Recipe be seen on our YouTube Channel of: Tasty Crunchy Maggi Pakoda For Kids Nasta Recipe
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहित्य:
1 पॅकेट मॅगी किंवा 2 कप मॅगी
½ लिटर पाणी (मॅगी शिजवण्यासाठी)
1 टे स्पून मॅगी मसाला
2 टे स्पून शिमला मिरची (बारीक चिरून)
2 टे स्पून गाजर (बारीक चिरून)
½” आल (किसून)
1 चीज क्युब (किसून)
2 टे स्पून कोथबिर (बारीक चिरून)
1 हिरवी मिरची (बारीक चिरून)
मीठ चवीने
5 टे स्पून ब्रेडक्रम
आवरणासाठी:
2 टे स्पून मैदा
मीठ चवीने
4 टे स्पून पाणी किंवा लागेल तसे
1 कप मॅगी (कुस्करून)
तेल मॅगी नाश्ता शालो फ्राय करण्यासाठी
कृती: मॅगी कुस्करून घ्या. शिमला मिरची, गाजर व कोथबिर बारीक चिरून घ्या. आल व चीज किसून घ्या. ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करा.
एका भांड्यात 500 मिलि पाणी गरम करून त्यामध्ये मॅगी घालून शिजवून घ्या. मग एका बाउलमध्ये काढून घ्या.
मग शिजलेल्या मॅगी मध्ये मॅगी मसाला, चिरलेली शिमला मिरची, गाजर, हिरवी मिरची, आल, कोथबिर, चीज, मीठ व ब्रेड क्रम घालून चांगले मिक्स करून घ्या. एका स्टीलच्या प्लेटला तेल लावून त्यामध्ये मॅगीचे बनवलेले मिश्रण घालून एक सारखे थापुन घेऊन प्लेट फ्रीजमध्ये अर्धातास सेट करायला ठेवा.
अर्धा तास झाल्यावर फ्रीज मधून स्टीलची प्लेट काढून मॅगीच्या मिश्रणाचे एक सारखे पिसेस कट करून घ्या.
एका बाउल मध्ये मैदा, मीठ व पाणी घालून थोडी पातळ सारखी पेस्ट बनवून घ्या. दुसऱ्या एका बाउलमध्ये मॅगी कुस्करून घ्या. किंवा ब्रेड क्रम घेतला तरी चालेल. मॅगीच्या कट केलेल्या पीस मधील एक पीस घेऊन मैदयाच्या मिश्रणात बुडवून मग कुस्करलेल्या मॅगीच्या बाउलमध्ये घोळून मग एका प्लेटमध्ये ठेवा. अश्या प्रकारे आपल्याला जितके पीस पाहिजे तितके पीस बनवून घ्या. बाकीचे पिसेस हवा बंद डब्यात ठेवून डीप फ्रीजमध्ये 8-10 दिवस ठेवले तरी चालते आपल्याला पाहिजे तेव्हा काढून आपण वापरू शकतो.
कढईमद्धे तेल गरम करायला ठेवा मग त्यामध्ये आवरण लावलेले मॅगीचे पिसेस घालून मध्यम विस्तवावर गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या. सर्व पिसेस तळून झाल्यावर टिशू पेपरवर ठेवा. मग प्लेट मध्ये ठेवून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.