शेव खमंग व कुरकुरीत होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स
Tips For Making Kurkurit Sev For Diwali Faral In Marathi
दिवाळी फराळ म्हंटले की लाडू, चिवडा, चकली, करंजीच्या बरोबर शेव ही हवीच ना. बरेच वेळा शेव बनवताना थोडी कडक किंवा चिवट किंवा मऊ पडते.
The Marathi language video Tips For Making Kurkurit Sev For Diwali Faral be seen on our YouTube Channel of: Tips For Making Kurkurit Sev For Diwali Faral
शेव जर छान कुरकुरीत झाली नाही तर फराळ करताना मज्जा येत नाही. तसेच चिवडा, चकली व शेव हे पदार्थ समोर आलेकी आपण पहिल्यांदा शेव, चकली किंवा चिवडा खातो.
शेव बनवताना काही सोप्या टिप्स लक्षात घेतल्या तर अगदी 100% आपली शेव मस्त होते. त्यासाठी काही टिप्स देत आहे.
1. बेसन वापरुन शेव बनवताना बेसन हे ताजे दळलेले घ्यावे.
2. शेव बनवताना बेसन व मसाले 2-3 वेळा सपीटीच्या चाळणीने चाळून घेतले तर शेव छान हलकी होते. लाल मिरची पावडर फार गडद रंगाची घेऊ नये नाहीतर शेव काळपट दिसते.
3. शेव मध्ये ओवा, लवंग किंवा मिरे घालायचा असेल तर आधी बारीक कुटून घ्या. मग चाळून घेऊन वापरा. किंवा जाड कुटलेले असेल तर पाण्यात थोडा वेळ भिजवून ते पाणी गाळून घेऊन मग वापरा.
4. शेवेचे पीठ फार वेळ भीजून ठेवू नये. भिजवलेल्या पिठाची शेव लगेच करावी. पीठ चांगले मळून घ्यावे.
5. शेवेचे पीठ फार पातळ किंवा घट्ट नसावे. पीठ सैल असेल तर शेव करताना गुठल्या पडतात. किंवा पीठ घट्ट झाले तर शेव करताना हात दुखून येतात. म्हणून पीठ नीट भिजवावे.
6. शेव तेलात घालताना तेल नीट गरम करून घ्या किंवा तेल गरम झाले की नाही ते चेक करून मगच शेव तेलात घाला.
7. शेव तेलात घालताना विस्तव मोठा ठेवावा मग मध्यम ठेवावा. शेव तळून झाली की पेपर वर ठेवावी.
8. शेव थंड झाल्यावर हवा बंद डब्यात भरून ठेवावी.
दिवाळी फराळसाठी शेव चे काही विविध प्रकार त्याची लिंक खाली देत आहे.
Sev Tamatar Sukhi Bhaji Recipe in Marathi
Crispy and Tasty Pudina Sev for Diwali Faral
Crispy Schezwan Sev for Diwali Faral
Spicy Tomato Sev for Diwali Faral
Decorative Ribbon Sev for Diwali Faral
Prepare Crispy and Spicy Ratlami Sev for Diwali Faral
Tasty Maharashtrian Style Sweet Sev for Diwali Faral
Lasoon Sev for Diwali Faral Recipe in Marathi
Bhavnagri Sev for Diwali Faral Recipe in Marathi
Crisp Potato-Aloo Sev Bhujia for Diwali Faral
Restaurant Sev Bhaji Recipe in Marathi
Tasty Nachni Sev Recipe in Marathi
Barik Sev for Diwali Faral