टेस्टी क्रिस्पी मॅगी स्प्रिंग रोल मुलांसाठी रेसीपी
Maggi Spring Rolls For Kids Recipe In Marathi
मॅगी म्हंटले की मुलांचा अगदी आवडता पदार्थ आहे. मग मॅगीचे स्प्रिंग रोल म्हणजे तर मग विचारुच नका. अगदी दोन मिनिटांत फस्त होतील. मॅगी स्प्रिंग रोल बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. आपण नष्टयला किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा बनवू शकतो. मस्त चविष्ट व कुरकुरीत लागतात.
मॅगी स्प्रिंग रोल बनवताना त्यामध्ये मॅगी, गाजर, शिमला मिरची वापरली आहे. त्यामुळे त्याची चव मस्त लागते. आपण इतर दिवशी सुद्धा चहा बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video Maggi Spring Rolls For Kids be seen on our YouTube Channel of: Maggi Spring Rolls For Kids
साहित्य:
आवरणाकरिता:
1 कप मैदा
¼ टी स्पून हळद
1 टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
तेल मॅगी स्प्रिंग रोल तळण्यासाठी
साहीत्य: सारणासाठी
1 छोटे पाकीट मॅगी
2 टे स्पून कांदा (चिरून)
2 टे स्पून गाजर (चिरून)
2 टे स्पून शिमला मिरची (चिरून)
2 टे स्पून कांदा पात (चिरून)
1 छोटी हिरवी मिरची
1 टे स्पून मॅगी टेस्ट मेकर (मॅगी मसाला)
मीठ चवीने
कृती: आवरणासाठी: एका बाउलमध्ये मैदा, हळद, मीठ व कडकडीत तेल मिक्स करून थोडेसे पाणी वापरुन घट्ट पीठ मळून घेऊन 1 तास बाजूला झाकून ठेवा.
सारणासाठी: एका पॅनमध्ये 1 ¼ कप पाणी गरम करायला ठेवा मग त्यामध्ये कांदा, गाजर, शिमला मिरची घालून एक उकळी आणा. उकळी आल्यावर त्यामध्ये मीठ चवीने, हिरवी मिरची, टेस्ट मेकर व मॅगी घालून मिक्स करून पाणी आटेस पर्यन्त शिजवून घ्या. मिश्रण थोडे कोरडे झाले पाहिजे.
मॅगी स्प्रिंग रोल बनवण्यासाठी: मळलेल्या पिठाचे लिंब एवहडे गोळे बनवून घ्या. मग एक गोळा घेऊन पुरी सारखा पातळ लाटून घ्या. लाटलेल्या पुरी वरती 1 1/2 टे स्पून सारण ठेवून प्रथम दोन बाजूनी मुडपून घ्या. पुरी मुडपल्यावर आयताकृती आकार तयार होईल मग त्याची गोल वळकुटी करून घ्या. वळकुटी करताना बाजूनी अगदी थोडेसे पाणी लावा म्हणजे पुरी छान चिटकेल. अश्या प्रकारे सर्व स्प्रिंग रोल बनवून घ्या.
कढईमद्धे तेल गरम करून घ्या. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये मॅगी स्प्रिंग रोल गोल्डन रंगावर तळून घ्या. सर्व मॅगी स्प्रिंग रोल तळून घ्या.
गरम गरम स्प्रिंग रोल टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.