दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा माहिती व महत्व
Diwali Padwa Balipratipada Mahiti And Mahatva in Marathi
लक्ष्मी पूजन 4 नोव्हेंबर 2021 गुरुवार ह्या दिवशी झाल्यावर 5 नोव्हेंबर 2021 शुक्रवार ह्या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध बलि प्रतिपदा हा दिवस पाडवा म्हणून साजरा करायचा आहे. साडेतीन मुहूर्ता पैकी एक असा हा दिवस आहे.
The Marathi language video Diwali Padwa Balipratipada Mahiti And Mahatva be seen on our YouTube Channel of: Diwali Padwa Balipratipada Mahiti And Mahatva
म्हणजेच ह्या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतात. पाडवा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. ह्या दिवशी पूर्ण दिवस शुभ मानला जातो. सोने खरेदी करण्यास हा दिवस चांगला मानला जातो तसेच ह्या दिवशी सुवासिनी आपल्या पतीला औक्षण करतात, व्यापारी वर्षाचा प्रारंभ ह्या दिवसाला सुरू होतो.
पौराणिक कथा नुसार बलप्रतिपदा ह्या दिवशी माता पार्वतीने भगवान शंकर हयाना द्युत ह्या खेळात हरवले होते म्हणून ह्या दिवसाला द्युत प्रतिपदा असे सुद्धा म्हणतात. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा पुत्र होता. त्याने राक्षस कुळात जन्म घेतला होता तरीही तो चारित्र्यवान, विनयशील, राजा म्हणून त्याची ओळख होती. तो दानशूर म्हणून सुद्धा प्रसिद्ध होता. पुढे त्याने आपल्या शक्तीने देवांचा सुद्धा पराभव केला होता. नंतर बळिराजला हरवण्यासाठी भगवान विष्णु यांची निवड केली. मग बळीराजानि यज्ञ केला तेव्हा यज्ञ केल्यावर दान देण्याची प्रथा होती. तेव्हा भगवान विष्णु यांनी वामनावतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजा समोर उभे राहिले या रूपात वामनाने तीन पावले भूमी मागितली.
वचनाला जागून बळिराजाने ही दान देण्याची तयारी दर्शवली तेव्हा वामन अवतारी विष्णुयांनी प्रचंड रूप धरण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवायला जागा राहिली नाही त्यामुळे वामनाने तिसरे पाऊल बळिराजाच्या डोक्यावर ठेऊन त्याला पाताळ लोकचे राज्य बहाल केले. बळीराजा सत्व शील, दानशूर होता त्याच्या ह्या गुणांमुळे बळिराजाला पाताळ लोकांचे राज्य बहाल करून त्याला दिलाकी कार्तिक प्रतिपदा ह्या दिवशी लोक तुझ्या दानशूर तेची, क्षमा शिलतेची पूजा करतील.
पाडव्याला पंचरंगी रंगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. इडा, पिडा टळो व बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाके वाजवून दिव्याची रोषणाई केली जाते. हा दिवस साडे तीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त म्हणून साजरा करतात.
पाडवा हा दिवस व्यापारी लोकांसाठी आर्थिक हिशोबच्या दृष्टीने नव वर्ष मानले जाते. लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्याची पूजा करून नवीन वर्षाचा आरंभ करतात. जमा खर्च च्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू करतात. वह्याना हळद-कुंकू, गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करतात व नवीन व्यवहार सुरू केले जातात. महाराष्ट्रमध्ये महिला ह्या दिवशी संध्याकाळी साज शृंगार करून पाटा भोवती रांगोळी पत्नी पतीचे औक्षण करते व पती आपल्या पत्नीला काही भेट वस्तु देतो. आपल्याकडे नवीन विवाहित मुलीची दिवाळी माहेरी साजरी करतात. व जावयाला काही आहेर देतात.