घरामध्ये हतीची मूर्ती किंवा चित्र लावण्याचे आश्चर्यकारक फायदे किंवा लाभ
Immense Vastu Shastra Benefits of Keeping Elephant of Statue At Home In Marathi
ज्योतिष शास्त्रानुसार किंवा फेंगशूई च्या तंत्रा नुसार घरात हतीची मूर्ती ठेवण्याचे बरेच फायदे होतात.
घरात हतीची मूर्ती ठेवताना तो उत्तर ह्या दिशेला ठेवावा. हतीची मूर्ती ठेवताना आई व तिचा बच्चा ठेवला तर त्या घरात लवकर संतान प्राप्ती होते.
The Marathi language video Immense Vastu Shastra Benefits of Keeping Elephant of Statue At Home be seen on our YouTube Channel of: Immense Vastu Shastra Benefits of Keeping Elephant of Statue At Home
ज्योतिष शास्त्रा नुसार वास्तु शास्त्र ह्याला फार महत्व आहे. किंवा फेंगशूई शास्त्रानुसार असे उपाय करणे खूप लाभदायक आहेत व त्याची लवकर प्रचिती सुद्धा मिळते. फेंगशूईच्या शास्त्रा नुसार घरात हतीची प्रतिमा ठेवणे शुभ मानले जाते. हत्तीची प्रतिमा ठेवल्याने आपल्याला आपल्या कार्यात सफलता मिळते व सौभाग्य प्राप्त होते. व घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
1. घरात हत्तीची प्रतिमा ठेवल्याने घरातील व्यक्तीची इच्छाशक्ति मजबूत होते, संतान प्राप्ती होते, बौद्धिक विकास होतो व त्याच बरोबर सामाजिक मान-सन्मान मध्ये वृद्धी होते.
2.घरात हतीची प्रतिमा ठेवल्यामुळे बरेच फायदे होतात. ज्या स्थानावर प्रतिमा ठेवली आहे त्या जागची ऊर्जा अजून वाढते.
3. असे म्हणतात की आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर हतीच्या प्रतिमेची जोडी ठेवल्यास घरातिल व्यक्तिच्या सुरक्षा संबंधित फायदे होतात.
4. हतीची प्रतिमा घराच्या मुख्य दरवाजावर लावल्यास घरात सुख-समृद्धी व सौभाग्य मिळते. त्याच बरोबर घरातील व्यक्तिना दीर्घ आयुष्य प्राप्त होते.
5. घरात हतीची मूर्ती ठेवताना हतीची सोंड वरील बाजूस असलेली प्रतिमा ठेवणे लाभदायक असते खालील बाजूस सोंड असलेली प्रतिमा ठेवू नये.
6. हतीची जोडी बेडरूममध्ये ठेवल्यास पती-पत्नीमध्ये संबंध चांगले राहून त्याच्या मध्ये प्रेम वाढते व त्याच्या मधील मतभेद दूर होतात.
7. घरात हतीची मूर्ती ठेवताना तिच्या शिशु बरोबर ठेवा म्हणजे घरातील मूल व आई ह्याचे मध्ये प्रेम खूप वाढते.
8. फेंगशूई च्या नुसार हतीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात धन आकर्षण होते.
9. घरातील उत्तर दिशेला हतीची प्रतिमा ठेवल्यास घरात सुख समृद्धी मिळते व जीवनात सफलता प्राप्त होते.
10.फेंगशूई च्या नुसार हतीची मूर्ती घरात ठेवने मंगल कारक असते. ज्याच्या घरात संतान नाही त्यांनी हत्तीची प्रतिमेची जोडी बेडरूम मध्ये आपल्या पलंगाच्या जवळ ठेवावी त्यामुळे संतान प्राप्ती होईल.
11. वास्तु शास्त्रा नुसार देवघरात चांदीच्या हत्तीची छोटी मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे आर्थिक सुबत्ता येते तसेच वास्तु दोष नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा घरात येते. जा आपल्याला चांदीची मूर्ती घेणे शक्य नसेल तर चंदेरी रंगाची मूर्ती घ्यावी.