तुळशी विवाह कथा
Tulsi Vivah Katha In Marathi
तुळशीला आपण देवा समान मानतो. हिंदू धर्मामध्ये साधारपणे प्रतेकच्या घरात तुळशीचे रोप लावलेले असते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. असे म्हणतात की ज्या घरात तुळस आहे तेथे रोग होत नाहीत.
भगवान विष्णु याना तुळशी खूप प्रिय असून असे म्हणतात की श्री हरी भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी तुळशी पत्र वाहिले की ते प्रसन्न होतात. ज्यांच्या घरी तुळशी विवाह साजरा करतात त्यांच्या घरी वैवाहिक सुख कायम राहते.
The Marathi language video Tulsi Vivah Katha be seen on our YouTube Channel of Tulsi Vivah Katha
तुळशी विवाह कथा:
पौराणिक मान्यता नुसार, राक्षस कुळा मध्ये एका मुलीचा जन्म झाला होता, तिचे नाव वृंदा होते. ती लहानपणा पासून भगवान विष्णु ह्याची साधना करायची तिचे साधना करण्यात अगदी बुडून जायची तिला कशाचे भान रहायचे नाही. जेव्हा वृंदा मोठी झाली व विवाह करण्यास योग्य झाली तेव्हा तिच्या माता-पितानि तिचा विवाह समुद्र मंथन च्या वेळी जलंधर नावाचा राक्षस जन्मला होता त्याच्या बरोबर तिचा विवाह करून दिला. भगवान विष्णु ह्याची सेवा व पतिव्रता असल्या कारणाने तिचे पती जलंधर खूप शक्तिवान बनले. मग सर्व देवी-देवता जलंधर च्या दुष्कृत्य ला घाबरायला लागले.
जलंधर जेव्हा जेव्हा कोणत्या सुद्धा युद्धावर जायला निघाला की वृंदा पूजा पाठ करायला बसायची. वृंदाची विष्णु भक्ति व साधनाच्या मुळे जलंधर ला युद्धात कोणी सुद्धा हरवू शकत नसे. एकदा जलंधरने देवतांवर आक्रमण केले तेव्हा जलंधर कोणी सुद्धा हरवू शकले नाही. तेव्हा हताश होऊन सर्व देव भगवान विष्णु ह्याच्या जवळ आले व त्यांनी जलंधर जी दुष्कृत्य करत आहे ते सांगितले व त्याच्या बदल विचार विनिमय करायला लागले,
भगवान विष्णु यांनी जलंधर चे रूप धारण करून तिचा पतिव्रता धर्म नष्ट केला. त्यामुळे जलंधरची शक्ति कमी कमी होत गेली व युद्धात मरण पावला. जेव्हा वृंदाला समजले की भगवान विष्णु यांनी तिच्या बरोबर छल कपट केले त्यामुळे तिने भगवान विष्णु यांना दगड बनण्याचा शाप दिला. जेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णु यांना दगड होताना पाहिले तेव्हा सगळे घाबरले आहे. मग माता लक्ष्मी ने वृंदा च्या जवळ प्रार्थना केली तेव्हा वृंदाने दिलेला शाप मागे घेतला. मग वृंदा आपल्या पतीच्या चिते बरोबर सती जाऊन भस्म झाली.
वृंदाच्या शरीराच्या राखेपासून एक रोप निघाले तिचे नाव भगवान विष्णु यांनी तुळशी असे ठेवले व स्वतःच्या रूपाला एका दगडाच्या रूपात सामावून म्हणाले की आज पासून तुळशीच्या विना कोणता सुद्धा प्रसाद ग्रहण करणार नाही. तसेच ह्या पत्थरला शालिग्राम च्या नावाबरोबर तुळशीला पूजले जाईल. तेव्हा पासून कार्तिक महिन्यात तुळशीचा विवाह भगवान शालिग्राम ह्यांच्या बरोबर केला जातो.