लाल भोपळ्याचे भरीत किंवा रायता अगदी सोप्या पद्धतीने बनवा
Red Pumpkin Raita or Lal Bhopla Bharit Simple Preparation Recipe in Marathi
लाल भोपळा त्यालाच तांबडा भोपळा म्हणतात. तांबडा भोपळा लाभदायक व पित्तशामक आहे. नाजुक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृतीच्या लोकांसाठी भोपळा आरोग्यदाई आहे. लाल भोपळा शीतल, रुचिवर्धक मधुर व बलदायक आहे. लाल भोपळा हा मानसिक रोग, हृदय रोग, फुफुसाचे रोग ह्यावर पथ्य कारक आहे. लाल भोपळ्याच्या सेवनाने रक्त वाहिन्या आकुंचन होतात. लाल भोपळ्याचे सेवन केल्याने शौचास साफ होते. चांगली झोप येते लाल भोपळ्यामध्ये विटामीन ए व सी भरपूर प्रमाणात आहे. तसेच प्रोटिन सुद्धा आहे.
The Marathi language video Red Pumpkin Raita Simple Preparation be seen on our YouTube Channel of Red Pumpkin Raita Simple Preparation
लाल भोपळ्याची भाजी, खीर, पराठा पुऱ्या खूप छान लागतात ह्याचे विडियो व आर्टिकल ह्या अगोदर प्रकाशित केले आहेत. तसेच ते चवीष्ट सुद्धा लागतात. लाल भोपळा रायता किंवा भरीत आपण जेवणात किंवा नाशत्याला सुद्धा बनवू शकतो.
आता आपण लाल भोपळ्याचे रायते कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 2 जणांसाठी
साहीत्य:
1 कप लाल भोपळा (किसून)
¼ कप दही
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 चमचा तेल
¼ टी स्पून मोहरी
¼ टी स्पून उदीडदाळ
1 हिरवी मिरची (चिरून)
7-8 कडीपत्ता पाने
कृती: प्रथम लाल भोपळ्याची साल काढून साफ करून धुवून घ्या. मग किसून घ्या.
एका कढईमद्धे किसलेला लाल भोपळा घेऊन त्यावर झाकण ठेवून मंद विस्तवावर 5 मिनिट वाफवून घ्या.झाकण काढून भोपळा हलवून परत दोन मिनिट झाकण ठेवा. मग विस्तव बंद करून कढई खाली उतरवून घ्या.
मग एका बाउलमध्ये वाफवलेला भोपळा घेऊन थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यामध्ये दही व मीठ चवीने घालून मिक्स करा.
फोडणीची कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये तेल गरम करून मोहरी, उदीडदाळ, हिरवी मिरची चिरून व कडीपत्ता पाने घालून मिक्स करून खमंग फोडणी भोपल्यावर घाला. मिक्स करून घ्या.
लाल भोपळ्याचे रायते किंवा भरीत चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.