हिवाळ्यामध्ये शेंगदाणा व गुळाची पौष्टिक चिक्कीचे आरोग्यदायी फायदे
Health Benefits Of Nutritious Shengdana Gulachi (Peanut) Chikki In Marathi
आता थंडीचा सीझन चालू आहे तेव्हा शेंगदाणा व गुळाची पौस्टिक चिक्की बनवावी. अश्या प्रकारची चिक्की आरोग्यदाई आहे. कारण शेंगदाणा व गुळाची पौस्टिक चिक्की ही आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
मुलं चॉकलेट खातात त्यामुळे दात खराब होतात त्या आयवजी त्यांना शेंगदाणा व गुळाची पौष्टिक चिक्की खायला द्या ती जास्त फायदेशीर आहे. आपण चिक्की बनवताना साखर सुद्धा वापरू शकतो पण साखरेच्या आयवजी गूळ वापरणे योग्य आहे.
The Marathi language video Health Benefits Of Nutritious Shengdana Gulachi (Peanut) Chikki be seen on our YouTube Channel of Health Benefits Of Nutritious Shengdana Gulachi (Peanut) Chikki
गूळ वापरुन बनवलेली चिक्की ही प्रोटिन व मिनरलचे पावर हाऊस आहे असे म्हणायला हरकत नाही. अश्या प्रकारची चिक्की आपली रोग प्रतिकार शक्ति वाढवते. तसेच त्याचे खूप सारे औषधी गुणधर्म आहेत. जसे की आपली स्कीन चमकदार बनते. मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो. हार्टच्या तक्रारीवर फायदेशीर आहे. वाढत्या वया बरोबर आपली स्मरणशक्ति कमी होते तर ती आपल्या स्मरणशक्ति वाढवते.
थंडीमध्ये आपली स्कीन कोरडी होते तेव्हा आपल्या स्कीनसाठी जे पोषक खाद्य आहे ते आपण सेवन केले पाहिजे. आपण आपल्या स्कीनसाठी लोशन लावत असतो तसेच आपली स्कीन आतून सुद्धा चांगली राहिली पाहिजे अश्या प्रकारच्या चिक्की मध्ये आपल्या स्कीनसाठी लागणारे सर्व गुण आहेत. शेंगदाण्यामध्ये विटामीन “e”, जिंक, मँगनेशियम आहे ते आपल्या स्कीनसाठी उपयोगी आहे. तसेच त्यामुळे आपली स्कीन चमकदार बनते.
आपला मेंदू म्हणजे आपले पॉवर हाऊस आहे वाढत्या वया बरोबर आपली स्मरणशक्ति कमी होते तेव्हा अश्या प्रकारच्या चिक्कीचे सेवन करावे. अश्या प्रकारच्या चिक्कीमध्ये एटिऑक्सिडेन्ट आहेत त्यामुळे डिमेशिया व अलजाईमर सारख्या आजाराशी लढण्याची शक्ति मिळते.
थंडीच्या सीझनमध्ये आपली शारीरिक हालचाल थोडी कमी होते तेव्हा आपले मेटाबॉलिक दर कमी होते त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून आपल्याला भरपूर अमिनो असिड खायला पाहिजे ते आपल्याला गूळ व शेंगदाणा मध्ये मिळते.
आपण रोजच्या जीवनात बऱ्याच प्रमाणात जंक फूड खात असतो त्यामुळे आपले पोट तर भरते पण त्याचा परिणाम म्हणजे आपले कोलेस्ट्रॉल वाढते व त्याचा परिमाण आपल्या हृदयावर होतो. म्हणून अश्या प्रकारची चिक्की खाल्ली तर कोरोनरी आर्टरी व स्ट्रोक पासून आपण वाचू शकतो.
डायबीटीज हा रोग असा आहे की तो कधी बरा होत नाही पण आपण कंट्रोल मध्ये ठेऊ शकतो गुळामध्ये मॅगेनीज आहे व कार्बोहायड्रेट आहे त्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते.